Home /News /national /

10 वर्षांच्या मुलाने 30 सेकंदात केले 10 लाख लंपास, बँकेतील CCTV व्हिडीओमध्ये कैद झाला थरार

10 वर्षांच्या मुलाने 30 सेकंदात केले 10 लाख लंपास, बँकेतील CCTV व्हिडीओमध्ये कैद झाला थरार

टेबल खाली लपलेल्या या 10 वर्षीय मुलानं हळूच 10 लाखांचे बंडल आल्या बॅगेत टाकले आणि बॅंकेतून निघून गेला. ही सगळी चोरी या मुलानं अवघ्या 30 सेकंदात केली.

    निमच (मध्य प्रदेश), 16 जुलै : मध्य प्रदेशात चक्क एका 10 वर्षांच्या मुलाने बॅकेंतून 10 लाख रुपये चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलानं 30 सेकंदात बॅंकेतील अधिकांऱ्यांच्या डोळ्यांसमोर 10 लाख चोरले. हा सर्व प्रकार बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. ही घटना मध्य प्रदेशातील निमच जिल्ह्यातील जवाद परिसरातील एका बँकेत घडली. बॅंकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा सकाळी 11 च्या सुमारास बॅंकेत प्रवेश करताना दिसत आहे. बॅंकेत ग्राहकांची मोठी गर्दी असल्यामुळे हा मुलगा बॅंकेत आल्याचे कोणी पाहिले नाही. उंची लहान असल्यामुळे तो टेबल खाली जाऊन बसला, यावेळी बॅंकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या एका महिलेने काउंटरवर पैसे ठेवले होते. टेबल खाली लपलेल्या या 10 वर्षीय मुलानं हळूच 10 लाखांचे बंडल आल्या बॅगेत टाकले आणि बॅंकेतून निघून गेला. ही सगळी चोरी या मुलानं अवघ्या 30 सेकंदात केली. बॅंकेतील अधिकाऱ्यांना यबाबत कळण्याआधीच हा मुलगा फरार झाला होता. वाचा-धक्कादायक! सॅनिटायझर लावल्यानं रुग्णालयात पोहोचला तरुण, 'हे' आहे कारण वाचा-डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक,मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा VIDEO टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी लगेचच पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. यातमध्ये एक लहान मुलगा पिशवीत पैसे टाकून जाताना दिसत होता. मुलांची उंची कमी असल्यामुळं तो टेबलखाली लपल्याचे कॅमेऱ्यातही दिसत नाही आहे आणि ग्राहकांची गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही हा मुलगा दिसला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हा मुलगा एकटा नसून, त्याच्या मदतीली एक तरुणही होता. बॅंके बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 10 वर्षीय मुलाचा साथीदार उभा असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी 2 संशयितांन ताब्यात घेतले असून, दोघांची कसून चौकशी केली जात आहे. वाचा-लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी हातात घेतली बॅट, अशी धुलाई कधीच पाहिली नसेल; पाहा VIDEO
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या