हावडा, 20 जून : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्याता आला आहे. परिणामी सर्व शाळा, महाविद्यालये गेले तीन महिने बंद आहेत. शाळा पुन्हा कधी सुरू होतील, याबाबत चर्चा सुरू असताना सध्या मुलांसाठी ऑनलाइन शाळा भरवल्या जात आहेत. अॅपच्या मदतीनं त्यांचे डिजीटल वर्ग भरतात. मात्र यातून कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीनं ऑनलाइन क्लासला उपस्थित राहू शकली नाही, म्हणून आत्महत्या केली. 10 वर्षीय शिबानी कुमारनं घरी लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नसल्यामुळं इतरांप्रमाणे ऑनलाइन लेक्चर ऐकता येत नाहीत, म्हणून हे असं टोकाचं पाऊल उचललं.
गुरुवारी शिबानी आपल्या खोलीत असताना, घरी कोणी नाही याचा अंदाच घेत तिनं पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी अद्याप कोणीतीही सुसाइड नोट सापडली नाही.
वाचा-24 तासात दुसरी धक्कादायक घटना! 26 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर दिले चटके
शिबानीचे बाबा संतू सऊ हे ट्रक ड्रायव्हर असून शिबानी दहावीमध्ये शिकत होती. शिबानीच्या बाबांनी दिलेल्या माहितीत, "शिबानी आणि तिचा भाऊ दोघंच कोलकातामध्ये होते. मी, तिची आई आणि मोठा भाऊ लॉकडाऊननंतर बिहारला गावी आलो. शिबानी आणि तिचा भाऊ शिवम यांच्याकडे एक फोन होता. मात्र तो फोन खराब झाला. लॉकडाऊनमध्ये फोन रिपेअर करून मिळाला नसल्यामुळं शिबानी घाबरली होती, की ती नापास होईल. ती रडायची, मला फोन करून सांगायची. मी तिला नवीन फोन घेऊन देईन".
वाचा-अरेरे! बैलगाडीसह शेतकरी पती-पत्नी ओढ्यात गेले वाहून
गुरुवारी जेव्हा शिबानीचा भाऊ शिवम क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेला तेव्हा शिबानीनं हे टोकाचं पाऊल उचललं. सायंकाळी 6 वाजता तेव्हा शिवम घरी परतला तेव्हा त्यानं बहिणीला पंख्याला लटकलेलं पाहिलं, तो घाबरून गेला. त्यानं शेजारी आवाज दिला, शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, शिबानी नैराश्यात होती असं कळलं. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे.
वाचा-
भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार 'हे' औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.