आंध्र प्रदेश, 18 मे : तिरुमलामध्ये मरण पावलेल्या भिकाऱ्याच्या घरातून दहा लाख रुपये आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (Tirumala Tirupati Devasthanam) दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना श्रीनिवासचारी यांच्या घरातून पैसे आढळले आहेत. श्रीनिवासचारी हा भीक मागून पैसे मिळवत होता. त्याला तिरुमलाजवळ शेषाचलम (Sheshachalam) नावाच्या ठिकाणी एक घर देण्यात आलं होतं. तो, 2007 पासून तिथे राहत होता. तेव्हापासून भीक (Begging) मागून मिळवलेले पैसे होत घरात ठेवत होता.
गेल्या वर्षी श्रीनिवासचारीचे निधन झाले. त्याला कोणतेच नातेवाईक नव्हते. त्यामुळे टीटीडीने (TTD) श्रीनिवासचारीला दिलेलं घर पुन्हा दुसऱ्या गरजूला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी टीटीडी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Revenue Department Officials) तिथे जाऊन परिसराची तपासणी केली असता, त्यांना नोटा भरलेल्या दोन ट्रंक आढळल्या. त्यामध्ये चलनातील नोटांसह बंद झालेल्या एक हजारच्या नोटांचाही समावेश होता. ती रक्कम 10 लाखांच्या घरात होती. टीटीडी अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आणि ती टीटीडीच्या तिजोरीत जमा केली आहे.
तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वराचे (LordVenkateshwara in Tirumala) मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर (World’s richest Hindu temple) आहे. कोरोना पूर्वीच्या काळात दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी यायचे.
दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला असाच एक वृद्ध माणूस रस्त्यावर भीक मागताना दिसला होता. तो आयआयटी-कानपूरचा (IIT-Kanpur) माजी विद्यार्थी असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरेंद्र वशिष्ठ हा 90 वर्षीय वृद्ध ग्वाल्हेरमध्ये रस्त्याच्या कडेला आढळल्यानंतर एका स्वयंसेवीसंस्थेने त्याला वाचवले होते.
“ते आम्हाला बस स्थानकाजवळ अत्यंत दयनीय अवस्थेत आढळले होते. जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी आम्हाला इंग्रजीमध्ये बोलून गोंधळात टाकले. आम्ही त्यांना आमच्या आश्रमात आणले आणि त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असे आश्रम स्वर्ग सदन (Ashram Swarg Sadan) या स्वयंसेवी संस्थेचे विकास गोस्वामी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते.
वशिष्ठ म्हणाले की, त्यांनी1969 मध्ये आयआयटी कानपूरमधून (IIT-Kanpur) मॅकेनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) आणि 1972 मध्ये लखनऊमधून एलएलएम (LLM)केले होते. 1990 मध्ये वशिष्ठ यांचे वडील सल्लागार असलेली जेसी मिल बंद झाल्यानंतर परिस्थिती बदलली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.