S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

काश्मीर: LoCवर 10 दहशतवादी लपले, व्यापार थांबवला!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LoC)10 दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

Updated On: Apr 24, 2019 03:19 PM IST

काश्मीर: LoCवर 10 दहशतवादी लपले, व्यापार थांबवला!

जम्मू, 24 एप्रिल: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LoC)10 दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या वृत्तानंतर सीमेलगतचा व्यापर थांबवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील 10 दहशतवादी LoC परिसरात आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यापारावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

LoC म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या सीमेवर दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिसरात होणाऱ्या व्यापाराच्या माध्यमातून शस्त्रे आणि अन्य अवैध वस्तू काश्मीर खोऱ्यात पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. गुप्तचर विभागानुसार बशीर अहमद भट, शब्बीर इलाही, शौकत अहमद भट, नूर मोहम्मद, खुर्शीद, इम्तियाज, अहमद खान, शाहिद, अहमद शाह, मेहराजुद्दीन, नजीर अहमद हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व काश्मीरमधील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षात पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर हे सर्व काश्मीरमध्ये कारवाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुळचे काश्मीरमधील असलेले हे सर्व जण पाकिस्तानात गेले. तेथे त्यांनी व्यापारी कंपन्या सुरू केल्या. आता काश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि कुटुंबाने पैसे पाठवण्याचे काम करत आहेत. दरम्यान सुरक्षा दलाकडून या दहशतवाद्यांनी पाठवलेल्या पैशांचा कुठे आणि कसा वापर केला याचा तपास सुरू आहे.VIDEO: सेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी रॅप साँग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close