NIA ची टीम घेणार दिल्ली स्फोटामागील कारणाचा शोध; वाचा 10 महत्त्वाच्या गोष्टी

हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत आहे.

हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलनादरम्यान दिल्लीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील इस्त्रायल वाणिज्य दूतावासाजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलं आहे. मात्र या स्फोटात 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं आहे. हे ही वाचा-मुंबईकरांसाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन दिल्ली स्फोटातून 10 महत्त्वाच्या गोष्टी 1. इस्रायल दूतावासाजवळ सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी ब्लास्ट झाला 2. फुटपाथजवळ IED लपवून ठेवलं होतं. 3. ब्लास्टमुळे तीन गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत. यामध्ये जीवित हानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. 4. दिल्लीतील VVIP भागात हा ब्लास्ट झाला असून इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर ब्लास्ट 5. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ब्लास्ट कमी तीव्रतेचा होता. गोंधळ पसरवण्यासाठी हा ब्लास्ट करण्यात आला आहे. 6. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत एनआयएनेदेखील कमी स्फोटाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 7. सीसीटीवीच्या आधारावर दोन संशयितांचा तपास सुरू आहे. 8. दिल्लीत बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम सुरू होता, त्यापासून कब्बल दोन किमी अंतरावर VVIP भागात ब्लास्ट झाला. 9. बीटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम असल्याकारणाने ट्रॅफिक डायवर्शन झाल्याने इस्त्रायली दूतावासाजवळ खूप कमी लोक होते. 10. हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: