1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर

नासाचं 'इनसाइट मिशन' 5 मे 2018ला सुरु होणार आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केली आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन 'बोर्डिंग पास' दिला गेला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 11:28 AM IST

1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर

09 नोव्हेंबर: मंगळ ग्रहावर एकादा तरी जावं असं सगळ्यांचंच स्वप्न असतं. पण आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. 'रेड प्लॅनेट' म्हणजेच मंगळ ग्रहावर जाण्यासाठी जगभरातून लोकांची उत्सुकता वाढली आहे. भारतातून 1 लाख 38 हजार 899 लोकांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीटही बुक केलं आहे. अमेरिकेची स्पेस एजंसी नासा(NASA) च्या 'इनसाइट मिशन'च्या अंतर्गत हे रजिस्ट्रेशन केलं आहे.

नासाचं 'इनसाइट मिशन' 5 मे 2018ला सुरु होणार आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केली आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन 'बोर्डिंग पास' दिला गेला आहे.

ज्या लोकांच रजिस्ट्रेशन झालं आहे त्यांच नाव एका सिलिकॉन वेफर मायक्रोचिपवर इलेक्ट्रॉन बीमच्या सहाय्याने लिहिलं जाणार आहे. ही नावाची अक्षरं माणसाच्या केसांपेक्षाही लहान असतील. मंगळावर जाणाऱ्यांच्या शरीरावरही चिप लावली जाईल.

नासाच्या सांगण्यानुसार, मंगळावर जाण्यासाठी जगभरातून 24 लाख 29 हजार 807 अर्ज मिळाले होते. त्यापैकी जागतिक स्तरावर भारताचा तिसरा नंबर आहे. या यादीतील पहिले नाव अमेरिकेचं आहे. अमेरिकेमधून 6 लाख 76 हजार 773 लोकांची मंगळावर जाण्यासाठी नोंदणी झाली आहे. त्याततच चीनमधून 2 लाख 62 हजार 752 लोकांना अर्ज केला आहे. अंतराळ तज्ज्ञांच म्हणण आहे की, मंगळ ग्रहावर जाणारे सर्वाधिक लोक अमेरिकी आहेत. पण अमेरिकेसोबत भारत आणि चीनमधूनही मोठ्या संख्येने लोक येत आहेत हे महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...