मराठी बातम्या /बातम्या /देश /200 रुपयांच्या लेहंग्यासाठी 1 लाखांना चुना ; Google Pay वरुन Transaction करणं विद्यार्थिनीला भोवलं

200 रुपयांच्या लेहंग्यासाठी 1 लाखांना चुना ; Google Pay वरुन Transaction करणं विद्यार्थिनीला भोवलं

दुर्देवाने या विद्यार्थिनीला लेहंगाही मिळाला नाही, आणि पैसेही गेले

दुर्देवाने या विद्यार्थिनीला लेहंगाही मिळाला नाही, आणि पैसेही गेले

दुर्देवाने या विद्यार्थिनीला लेहंगाही मिळाला नाही, आणि पैसेही गेले

gजोधपुर, 11 जानेवारी : राजस्थानच्या (Rajasthan) जोधपुर (Jodhpur) जिल्ह्यात सायबर फसवणुकीची (Cyber Fraud) मोठी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मंडोर पोलीस ठाणे हद्दीत नागौरी बेरामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत फसवणूक करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील मंडोर पोलीस ठाणे हद्दीत नागौरी बेरामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत सायबर फसवणूक झाली आहे. या विद्यार्थिनीला ऑनलाइन लेहंगा मागवणं चांगलच महागात पडलं आहे. (1 lakh for a lehenga of Rs 200 Transactions from Google Pay cost the student dearly)

दुर्देव म्हणजे तिला लेहंगा तर मिळाला नाही, उलटपक्षी 1 लाख रुपये गमवावे लागले. विद्यार्थिनीने लेहंगा मिळाला नाही म्हणून रिफंडला 199 रुपये मागितले तर गूगल-पे (Google Pay) च्या माध्यमातून तिच्या खात्यातील 99 हजारांहून अधिक रक्कम कमी झाले. विद्यार्थिनीने मंडोर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मंडोर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेशचंद्र सोनी यांनी सांगितलं की, प्रेक्षा पुत्री कृष्ण कुमार पांडे हिने एक रिपोर्ट दाखल केली आहे. यामध्ये दिल्यानुसार तिने ऑनलाइव 199 रुपयांचा लेहगां ऑर्डर केला होता. गेल्या जानेवारी रोजी तिने हा लेंहगा बुक केला होता. लेहंगा 9 जानेवारी रोजी डिलिव्हर होणार होता. मात्र डिलिव्हरी डेट पुढे ढकलली. त्यावेळी गुगलवर कस्टमर केअरशी संपर्क केला. तेव्हा तिला सांगण्यात आलं की, लेहंगाचा स्टॉक संपला आहे आणि पैसे रिफंड करण्यात येणार आहे.

हे ही वाचा-पॉर्न व्हिडीओ पाहून शारीरिक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू की हत्या? प्रेयसीला अटक

अशी केली फसवणूक

विद्यार्थिनीने पोलिसांनी केलेल्या तक्रारीत सांगितलं की, तिने आरोपीला सांगितलं होतं की ती फोनवरुन गुगल पे अकाऊंट पाठवते. तेव्हा आरोपीने पहिल्यांदा एक रुपये तिच्या खात्यात रिफंड केलं.  (1 lakh for a lehenga of Rs 200 Transactions from Google Pay cost the student dearly) त्यानंतर डेबिट केलं. पुन्हा त्याने एक रुपये रिफंड केलं आणि डेबिट केलं. यानंतर सातत्याने विद्यार्थिनीच्या खात्यातून रुपये काढत राहिला आणि असं करीत 95 हजार 874 रुपये काढले. यानंतर पुन्हा 3 हजार 129 रुपये काढले. खात्यातून पैसे जात असल्याचे पाहून विद्यार्थिनीने आपल्या खात्यातीन रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. आरोपीला विद्यार्थिनीने आपल्या एसबीआय अकाऊंटची माहितीदेखील शेअर केली होती.

First published:
top videos

    Tags: Cyber crime