मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुलीच्या पोटातून काढला एक फुटाहून लांब आणि 10 सेमी जाडीचा केसांचा गुच्छा; घटनेने डॉक्टरही हैराण

मुलीच्या पोटातून काढला एक फुटाहून लांब आणि 10 सेमी जाडीचा केसांचा गुच्छा; घटनेने डॉक्टरही हैराण

केसांच्या गुच्छाने या मुलीच्या पोटाचा जवळपास 90 टक्के भाग कव्हर केला होता. त्यामुळे पोटात खाण्यासाठी केवळ 10 टक्केच जागा राहत होती. त्यामुळे तिला अधिक जेवण जात नसे. तिला जेवण पचतही नव्हतं.

  • Published by:  Karishma
जयपूर, 24 जानेवारी : लहान मुलांना अनेकदा नखं खाण्याची, केस तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे मुलांकडे अतिशय कटाक्षाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लहानपणापासून सतत तोंडात केस घालणाऱ्या एका मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 15 वर्षीय मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी केसांचा मोठा एक फूटाहून लांबीचा आणि 10 सेमी जाडीचा गुच्छाच बाहेर काढला आहे. ही घटना अलवर शहात घडली आहे. केसांच्या गुच्छाने या मुलीच्या पोटाचा जवळपास 90 टक्के भाग कव्हर केला होता. त्यामुळे पोटात खाण्यासाठी केवळ 10 टक्केच जागा राहत होती. तिला अधिक जेवण जात नसे. तिला जेवण पचतही नव्हतं. पोटदुखी, उलटी येणं, पोट जड वाटणं अशा अनेक पोटाच्या समस्यांमुळे तिला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं.

(वाचा - मम्मी प्लीज शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा'; चिमुकल्याचा क्यूट VIDEO VIRAL)

डॉ. उपाध्याय यांनी त्या मुलीच्या पोटाची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये तिच्या पोटात काहीतरी अनावश्यक असल्याचं दिसलं. सोनोग्राफीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशनवेळी डॉक्टरांनी मुलीच्या पोटातून केसांचा एक फूटहून लांब आणि 10 सेमीपेक्षा अधिक जाडीचा केसांचा गोळाच बाहेर काढला. डॉक्टरही या घटनेने हैराण आहेत. ऑपरेशननंतर मुलीची तब्येत उत्तम असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO)

डॉ. उपाध्याय यांनी, मुलीने लहानपणापासून नकळतपणे केस, नखं, बाजारातील मिलावटी गोष्टी खाल्या असतील. त्या हळू-हळू एकत्र येतात आणि पचत नसल्याने त्याचा एक गुच्छाच पोटात तयार झाला. त्या गुच्छाने तिच्या पोटाचा संपूर्ण 90 टक्के भाग व्यापला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ज्या मुलांची मानसिक स्थिती स्थिर नसते, त्यांना केस खाण्याची सवय असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लहान मुलं कुठे जातात, काय खातात याकडे लहानपणापासूनच लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
First published:

पुढील बातम्या