1 एप्रिलच्या आधी 'हे' काम नाही केलंत तर तुमचा टीव्ही होईल बंद

1 एप्रिलच्या आधी 'हे' काम नाही केलंत तर तुमचा टीव्ही होईल बंद

तुम्हाला हवी ती चॅनेल्स निवडायचं काऊंटडाऊन सुरू झालंय. आता फार थोडे दिवस उरलेत.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : तुम्हाला हवी ती चॅनेल्स निवडायचं काऊंटडाऊन सुरू झालंय. आता फार थोडे दिवस उरलेत. TRAIचे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. अगोदर डेडलाइन 1 फेब्रुवारी होती. ती वाढवून 31 मार्चपर्यंत केली गेली होती.

आता केबल आॅपरेटर आणि डीटीएच आॅपरेटर्स आपल्याला हवी ती चॅनेल्स ग्राहकांच्या माथी मारू शकणार नाहीत. आता ग्राहकांच्या पसंतीची चॅनेल्स द्यावी लागतील. प्रत्येक चॅनेलची किंमत आपल्या टीव्ही स्क्रीनवर झळकत असते. त्यामुळे आता कुणाला फसवता येणार नाही.

आता दर महिन्याला किती खर्च येणार?

ग्राहकांना 100 चॅनेल्सचे 130 रुपये आणि जीएसटी धरून 150 रुपये पडतील. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त चॅनेल्स पाहात असाल तर 25 चॅनेल्ससाठी जास्त 20 रुपये द्यावे लागतील. पे चॅनेल्स निवडले तर त्यांचे पैसे द्यावे लागतील. TRAIनं प्रत्येक चॅनेलच्या किंमतीची रेंज 1 ते 19 रुपये ठेवलीय. निरीक्षण असं आहे की प्रेक्षक जास्तीत जास्त 40 चॅनेल्स पाहतात किंवा सर्फिंग करतात.

130 रुपयात कुठले चॅनेल्स पाहायला मिळतील?

यात सगळे फ्री टु एअर चॅनेल्स निवडू शकता. पे चॅनेल्सला जास्त पैसे भरावे लागतील.100 FTA चॅनेल्ससाठी 150 रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये जास्त द्यावे लागतील. ट्रायनं सांगितलंय, फ्री टु एअर 534 चॅनेल मोफत आहे.

चॅनेलची लिस्ट कुठे मिळणार?

डीटीएच कंपन्यांच्या वेबसाइटवर ही लिस्ट आहे. शिवाय ट्रायच्या वेबसाइटवर https://channel.trai.gov.in/ 342 चॅनेल्सची यादी आहे.

आॅपरेटर अजूनही पॅकेज आॅफर करू शकतात का?

TRAY अनुसार चॅनेल्स निवडणं ग्राहकाच्या हातात आहे. लोकल केबल आणि ग्राहक परस्पर सहमत असतील तर प्रश्न नाही.

18 टक्के जीएसटी

सर्व ग्राहकांना 130 रुपये महिन्याला द्यावे लागतील. त्यात 100 फ्री टु एअर चॅनेल्स आहेत. त्यात 25 दूरदर्शनची चॅनेल्स अनिवार्य आहेत. ग्राहक बाकी 75 चॅनेल्स आपल्या मर्जीनुसार निवडू शकतील. त्यात 18 टक्के जीएसटी आहे.

SPECIAL REPORT: आजीची घोषणा तारणार का नातवाला?

First published: March 26, 2019, 11:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading