• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन संपन्न

मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन संपन्न

  • Share this:

modi new banner1231

24 डिसेंबर :  मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या भव्यदिव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन  आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे, संभाजीराजे हेही  उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना राज्याभरातून आलेले पवित्र जल आणि मातीचे कलश सुपूर्द केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी निवडक निमंत्रितांसोबत ते अरबी समुद्रातील स्मारकासाठीच्या नियोजित ठिकाणी जहाजातून रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी जलअर्पण केलं. समुद्रात तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या मेघडंबरीला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर ते पुन्हा गिरगाव चौपाटीकडे रवाना झाले.

अरबी समुद्रातील 16 हेक्टर आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा अश्वारुढ भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे. या स्मारकाला एकूण 3600 कोटी इतका खर्च येणार आहे. स्मारकासोबत शिवकालीन इतिहास आणि अनेक अद्यायावत सुविधा याठिकाणी असणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: