मराठी बातम्या /बातम्या /देश /

कन्हैयाच्या जामिनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

कन्हैयाच्या जामिनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

KANHAIYA-KUMAR-facebook

मुंबई -19 फेब्रुवारी : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला सुप्रीम कोर्टानं आज (शुक्रनारी) जोरदार दणका दिला. सत्र आणि हायकोर्टात न जातता थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी धाव घेणार्‍या कन्हैयाच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला. कन्हैयानं जामिनासाठी हायकोर्टातच जावं, असं निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

पटियाला हाउस कोर्टात वकिलांकडून झालेल्या हल्ल्यानंतर कन्हैया कुमारनं जामिनासाठी सुप्रीम कोर्टाने अर्ज केला होता. खालच्या कोर्टात आपल्याला न्याय मिळण्याची आशा नसून जीवाला धोका असल्याचं त्यानं याचिकेत म्हटलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

हायकोर्ट हे प्रकरण हाताळू शकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. याचिकाकर्त्यांनी आधी तिथं जावं. जामिनासाठी थेट सुप्रीम कोर्टात येण्याची वेळ अजून आलेली नाही,' असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्याचवेळी, पटियाला हाउस कार्टातील वातावरण योग्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. त्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि त्याच्या वकिलांना योग्य ती सुरक्षा पुरवण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही कोर्टाने दिल्ली आणि केंद्र सरकारला दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, वकिल

पुढील बातम्या