मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik Lockdown चा निर्णय का घेण्यात आला, काय आहे नियमावली?

Nashik Lockdown चा निर्णय का घेण्यात आला, काय आहे नियमावली?


अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

नाशिक जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.12 ते 22 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

नाशिक, 10 मे : नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती(Nashik Corona cases) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली  आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा (Nashik Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.12 ते 22 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,पालिका आयुक्त कैलास जाधव या समितीचा हा निर्णय आहे.

लॉकडाऊनमध्ये भटकणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, पाहा VIDEO

लॉकडाऊनच्या काळात केवळ वैद्यकीय कारणांसाठीच बाहेर पडता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर कायम आहे. पॉझिटिव्हीटी रेट देखील चाळीस टक्यांवर होता गेला. आता तो 26 ते 28 टक्कयांवर आला असला तरी, रूग्णांची संख्या कायम आहे.

राज्य शासनाने 5 एप्रिलपासून निर्बंध लागू केले आहे.  त्यानुसार 22 एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू असणार आहे. परंतु रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये खासगी आस्थापना देखील पूर्ण बंद राहणार आहे.

- सरकारी आस्थापना मात्र 15 टक्के उपस्थितीत राहणार सुरू

- सकाळी 7 ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाजीपाला दुकानं राहणार सुरू

- किराणा दुकानातून होणार फक्त होम डिलिव्हरी, काउंटर सेल बंद

- जिल्ह्यातील 15 प्रमुख आणी 4 उप,अश्या 19 बाजारसमिती 10 दिवस राहणार बंद

- फक्त अत्यावश्य्क सुविधांचीच दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

- सर्व प्रकारचे आठवडे बाजार देखील बंद

- वैद्यकीय कारणाशिवाय केाणालाही बाहेर पडता येणार नाही

- विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.

First published: