मराठा आरक्षणाचं काय, संभाजीराजे आज करणार भूमिका जाहीर?

मराठा आरक्षणाचं काय, संभाजीराजे आज करणार भूमिका जाहीर?

मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं सूचक ट्विट संभाजीराजेंनी केलं होतं.

  • Share this:

नाशिक, 19 मे: मराठा आरक्षण (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखत आहे. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनीही लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार, असं जाहीर केले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे संभाजीराजे आज  पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षणासाठी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे. एकीकडे राज्य सरकारने थेट राष्ट्रपतींकडे याबद्दल मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींवर संभाजीराजे भाष्य करणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं सूचक ट्विट संभाजीराजेंनी केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  उपसमित्या आणि विरोधकांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरही संभाजी राजे काय बोलणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

कोरोना संसर्ग झाल्याच्या भीतीनं प्यायला रॉकेल; चाचणीत झाला वेगळाच खुलासा

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयामध्ये आरक्षण बहाल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या मार्फत करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारनं तातडीने सुप्रीम कोर्टामध्ये 102 व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली. हा विषय राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांशी निगडीत आहे. त्यामुळे राज्य सरकारनंही यावर तातडीने फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी खासदार संभाजीराज छत्रपती यांनी केली होती.

Published by: sachin Salve
First published: May 19, 2021, 8:45 AM IST

ताज्या बातम्या