Home /News /nashik /

'आम्ही मोदींकडे विनंती केलीये, संभाजीराजेंनी दिल्लीतही मोर्चा काढावा' -संजय राऊत

'आम्ही मोदींकडे विनंती केलीये, संभाजीराजेंनी दिल्लीतही मोर्चा काढावा' -संजय राऊत

'दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. मराठा आरक्षण ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते'

    नाशिक, 14 जून: मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विनंती केली आहे. संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढावा' असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 'संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. मराठा आरक्षण ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊ हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी निर्णय घ्यायचा आहे ' असं म्हणत राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवला. '5 वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच' 'आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही.  शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं' असं राऊत यांनी स्पष्ट केलं. 'महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं गैर नाही. 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष आहे' असंही राऊत म्हणाले. 'प्रशांत किशोर यांची सेनेनंही मदत घेतली' 'प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्यात. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकांबाबत माहिती गोळा करून ती पक्षांना देणे हे त्यांचं काम आहे. कधीकाळी प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत होते. पंजाबमध्ये कॅप्टन अमेंद्ररसिंग, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम केले आहे. शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी काम केले आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार हे नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून माहिती गोळा करत असता, असा माझा अनुभव आहे' असंही राऊत यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या