"आम्ही करेट कार्यक्रम केला अन् दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला" : संजय राऊत

Sanjay Raut : आम्ही यांचा करेक्ट कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी केला असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

नाशिक, 20 नोव्हेंबर : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक (nashik) दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे संजय राऊत यांनी एक कार्यक्रमात भाषण करताना भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 'यांना काय जमतंय.. अरे आम्ही करुन दाखवलं, करेक्ट कार्यक्रम करुन टाकलाय' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, सकाळी मला पत्रकार भेटले आणि मला त्यांनी विचारलं की, काल शेतकऱ्यांचा मोठा विजय झालेला आहे. कसं वाटतंय? मी म्हटलं मला सुद्धा वाटतंय की स्वातंत्र्य आजच मिळालंय या देशाला. कंगना रनौत आणि विक्रम गोखले यांनाच वाटलं पाहिजे असं नाही. आमचा शेतकरी जिंकला आहे. ज्या शेतकऱ्यांनी दीड वर्षे लढाई केली रस्त्यावर... मी गेलोय त्या ठिकाणी त्यांची हाल पाहिले आहेत. मी जेव्हा-जेव्हा गेलोय तेव्हा प्रत्येकवेळेला त्या पंजाबच्या शेतकऱ्यांकडून शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणा ऐकायला मिळाल्या.

शेतकऱ्यांना विजय मिळाला

शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतंय आपण मघार घेतली पाहिजे. जसं आंदोलन झालं होतं त्यावेळी 'चले जाव...' आणि संपूर्ण देश रस्त्यावर उतरला. त्यावेळी इंग्रजांना वाटलं की आपण पळून गेलं पाहिजे. तसंच झालं यांना वाटलं आपण परत गेलो पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि पाहणार नाही की कोण पंतप्रधान आणि कोण गृहमंत्री आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांना विजय मिळाला असंही संजय राऊत म्हणाले.

वाचा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, "बुधवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर..."

करेक्ट कार्यक्रम करुन टाकलाय...

संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रालाही दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं ना? ते काय कमी आहे का? की महाराष्ट्रावर भगवा फडकला. मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले. यांना काय जमतंय.. अरे आम्ही करुन दाखवलं, करेक्ट कार्यक्रम करुन टाकलाय.

नाशिकमध्ये 100 नगरसेवक विजयी होण्याची ताकद

कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायच हे बाळासाहेबांनी शिकवले आहे. नाशिकमध्ये 100 नगरसेवक निवडून येण्याची ताकत असलेले लोक आपल्यात आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 100 नगरसेवक विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

वाचा : 2014 पासून खरं स्वातंत्रय मिळालं हे आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही : विक्रम गोखले

...म्हणून सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी

सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. रामदास कदम सुद्धा कडवट शिवसैनिक आहेत. सुनील कदम हे वरळी मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली आमदारकी सोडली. हा त्यांचा त्याग आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालं असंही संजय राऊत म्हणाले.

First published: November 20, 2021, 1:59 PM IST

ताज्या बातम्या