Home /News /nashik /

सोमेश्वर धबधब्यात पोहणे जीवावर बेतले, डोळ्यादेखत 2 मित्र पाण्यात बुडाले, नाशिकमधील घटना

सोमेश्वर धबधब्यात पोहणे जीवावर बेतले, डोळ्यादेखत 2 मित्र पाण्यात बुडाले, नाशिकमधील घटना

धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी आपल्या चार मित्रांसह नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते.

    नाशिक, 19 एप्रिल : राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे जीवाची पार लाही लाही होत आहे. अशातच नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर (nashik someshwar waterfall) पोहणे दोन तरुणाच्य जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोळ्यादेखत दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी अशी पाण्यातून बुडून मृत झालेल्याा तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण देवळाई परिसरात राहणारे होते. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (..अन् विमानातच ढसाढसा रडू लागली एअर होस्टेस; VIDEO पाहून भावुक झाले लोक) धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी आपल्या चार मित्रांसह नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते. धबधब्यावर फिरल्यानंतर चारही मित्रांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र,काही वेळानंतर अचानक धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी दोघे पाण्यात बुडायला लागले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. पण, दोघांचाही बुडून मृत्यू झाला. (कंटेनरची रिक्षाला जबर धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू, बुलडाण्यातील घटना) घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि  अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. दोन्ही मित्रांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असून मुलांच्या मृत्यूमुळे मन हेलावून टाकणार एकच आक्रोश केला आहे.

    तुमच्या शहरातून (नाशिक)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या