Home /News /nashik /

शिवाच्या पाय घसरला आणि शेततळ्यात पडला, त्याला वाचवायला हर्षलनेही उडी मारली, अन्....

शिवाच्या पाय घसरला आणि शेततळ्यात पडला, त्याला वाचवायला हर्षलनेही उडी मारली, अन्....

हर्षल इयत्ता 7 वीत तर शिवा इयत्ता 5 वित शिकत होता. सायंकाळी जगताप दाम्पत्य घरी आल्यावर दोन्ही मुले घरात नसल्याचे पाहून

हर्षल इयत्ता 7 वीत तर शिवा इयत्ता 5 वित शिकत होता. सायंकाळी जगताप दाम्पत्य घरी आल्यावर दोन्ही मुले घरात नसल्याचे पाहून

हर्षल इयत्ता 7 वीत तर शिवा इयत्ता 5 वित शिकत होता. सायंकाळी जगताप दाम्पत्य घरी आल्यावर दोन्ही मुले घरात नसल्याचे पाहून...

येवला, 05 ऑगस्ट : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी (maharashtra rain) लावल्यामुळे ठिकठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहे. तर कुठे तळे काठोकाठ भरले आहे. शेततळ्यावर फिरायला गेलेल्या भावाचा पाय घसरला आणि बुडत असल्याचं पाहून दुसऱ्या भावानेही तलावात उडी मारली, पण दुर्दैवाने दोन्ही भावांचा (Two brothers drown) यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना येवल्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शेततळ्यात बुडून दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येवल्याच्या एरंडगाव बुद्रुक येथे घडली.  हर्षल संतोष जगताप (वय-13) आणि शिवा संतोष जगताप(वय-11)अशी या भावंडांची नावं आहे. या घटनेमुळे येवला तालुक्यात शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे. करुणा शर्मा अटक प्रकरणाला धक्कादायक वळण, गाडीजवळ 'ती' महिला कोण? VIDEO या बाबत अधिक वृत्त असे की, येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथील शेतकरी संतोष जगताप हे पत्नी, हर्षल आणि शिवा या दोन मुलासोबत राहत होता. आई-वडील बाहेर गेल्याचे पाहून दोघे भाऊ शेतातील शेततळ्यावर गेले होते. शिवाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडल्यानंतर लहान भावाला वाचविण्यासाठी हर्षलने पाण्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी विवाहित शिक्षिकेला अटक, वाचा सविस्तर हर्षल इयत्ता 7 वीत तर शिवा इयत्ता 5 वित शिकत होता. सायंकाळी जगताप दाम्पत्य घरी आल्यावर दोन्ही मुले घरात नसल्याचे पाहून त्यांचा शोध घेतल्यानंतर दोघांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे येवला तालुक्यात शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या