मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिकजवळ चालत्या गाडीवर कोसळलं झाड, विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिकजवळ चालत्या गाडीवर कोसळलं झाड, विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू

दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक, 21 जुलै : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) दिंडोरीमध्ये (Dindori) एका विचित्र अपघातात (Road Accident) तिघांचा मृत्यू (Three dead)  झाला आहे. जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं चित्र असून पावसाळ्यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालल्याचं दिसून येत आहे. दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

असा झाला अपघात

दिंडोरी जिल्ह्यात वलखेड फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका आर्टिगा कारमधून पाच जण प्रवास करत होते. त्यांची गाडी वलखेड फाट्याजवळ आली असताना रस्त्यातील झाड खाली कोसळलं. त्याचवेळी त्यांची गाडी त्या झाडाखालून पुढे जात होती. हे झाड नेमकं त्या गाडीवर कोसळल्यामुळे गाडीतील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

तीन शिक्षकांचा मृत्यू

या कारमधून तीन शिक्षक प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. दत्तात्रय बच्छाव, किशोर सूर्यवंशी आणि नितीन तायडे या शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला. हे तिघंही सुरगाणा तालुक्यातील अलंगून शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही कळायच्या आतच या तिघांना आपले प्राण गमावावे लागले.

हे वाचा - Shocking! भारतात कोरोना व्हायरसमुळे 50 लाख लोकांचा मृत्यू?

रस्ते सुरक्षेचा प्रश्न

रस्त्यावर वाहनचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात वाढत चालले असता, अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्य अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे या तीन शिक्षकांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्यात बाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि जोरदार वारे किंवा पाऊस पडत असेल, तर सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन पाऊस थांबल्यानंतरच पुढचा प्रवास सुरू करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Nashik