Home /News /nashik /

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 10 वर्षे अत्याचार; नाशकातील तरुणीची कहाणी वाचून बसेल धक्का

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 10 वर्षे अत्याचार; नाशकातील तरुणीची कहाणी वाचून बसेल धक्का

Rape in Nashik: नाशिक शहरातील एका तरुणीवर तब्बल दहा वर्षे बलात्कार (rape for 10 year) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral nude photos) देत, तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे.

पुढे वाचा ...
    नाशिक, 23 जानेवारी: नाशिक (Nashik) शहरातील एका तरुणीवर तब्बल दहा वर्षे बलात्कार (rape for 10 year) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral nude photos) देत, तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून विविध ठिकाणी घेऊन जात, जबरदस्तीने अत्याचार केला आहे. अनेक वर्षांपासून आरोपीचा अत्याचार निमूटपणे सहन केल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह, ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश राजाराम भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी भोसले हा खोडेनगर परिसरातील मातोश्री कॉलनी येथील रहिवासी आहे. आरोपीनं पीडित तरुणीला अश्लील चित्रफिती दाखवून कळत नकळत मद्य पाजून तिचं लैंगिक शोषण केलं आहे. हेही वाचा-मुंबई: पतीला डांबून महिलेवर केला रेप; गावगुंडाची पोलिसांनी काढली धिंड,पाहा VIDEO सप्टेंबर 2012 पासून ते जानेवारी 2022 पर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. दरम्यानच्या काळात आरोपी भोसले याने पीडित युवतीचे नग्नावस्थेत फोटो, व्हिडीओ काढून (Shoot obscene photos and videos) ते नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देत, तिच्यावर इगतपुरी येथील रिसॉर्ट, राहत्या घरी, तपोवनातील निर्जन ठिकाणी आणि औरंगाबाद रस्त्यावरील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हेही वाचा-पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये रेप, मग गाठला विकृतीचा कळस आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 30 वर्षीय पीडित महिलेनं मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nashik, Rape

    पुढील बातम्या