नाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, मात्र आरोग्य यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती?

नाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, मात्र आरोग्य यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती?

पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यानं, नाशिक जिल्हा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असला तरी अचानक वाढलेली बळींची संख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

नाशिक, 19 जून : पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यानं, नाशिक जिल्हा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असला तरी अचानक वाढलेली बळींची संख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. नाशिकमधील मृतांची संख्या लपवली का तांत्रिक अडचण हा आता वादाचा मुद्दा ठरला आहे. काेरोनाकाळातील बळींचा आकडा लपवल्यावरुन आता नोटीस-नोटीस खेळ सुरू झाला आहे. अवघ्या 1 महिन्यात तब्बल 3100 नव्या बळींचा फरक समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

वाचा News 18 चा हा खास रिपोर्ट. नाशिकमधील अमरधाम येथे दररोज मोठ्या संख्येने कोरोना बळींवर अंत्यसंस्कार केले जात होते. गेल्या 3 महिन्यात तर अमरधामला अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग होती. आता ही संख्या कमी झाली असली तरी अचानक सरकारी पोर्टलवर मृतांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. आणि कोरोना मृत्यू लपवल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे हे दाखवण्यासाठी हे सरकारी षड्यंत्र असल्याचं सामाजिक कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत.

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून नोटिसींचा खेळ सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी थेट घटक व्यवस्थापक डॉ अनंत पवार यांना यासाठी जबाबदार धरलं आहे. जिल्ह्यातील सरकारी आणी सर्व खाजगी रुग्णालयातील बळींची संख्या संकलित करून अहवाल सादर करण्याच्या जबाबदारीत कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा-व्हॅलेंटाईनला प्रपोज अन् मंदिरात सर्वांसमोर लग्न,संजय-शिवलक्ष्मीची प्रेमकहाणी

डॉ अनंत पवार यांनी पालिकेला नोटीस बजावली आहे. यासह 188 कोविड सेंटरवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र धोका ओळखलेल्या पालिका आरोग्य विभागानं दिलेलं उत्तर हे तर अगदीच कळस होता. त्यांनी सांगितलं की, संकलन करण्यात डॉ अनंत पवार यांनी चाल ढकल केली आहे. खरं तर, जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचं जिल्ह्यातील बळींच्या संख्येवर थेट नियंत्रण असताना संकलित अहवाल पोर्टलवर अपडेट करणं आणि त्याचा फिजिकल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणं हे त्यांचं रोजचं काम आहे. त्यामुळे नेमकी गडबड इथेच झाली का, ही बाब अद्याप समोर आलेली नाही.

अहवाल क्रमांक 1

दिनांक 18 मे 2021 बळींची एकत्रित संख्या 4130

अहवाल क्रमांक 2

दिनांक 18 जून 2021 बळींची संख्या 7235

अवघ्या 1 महिन्यात 3100 मृत्यूच्या संख्येत फरक

हा फरक जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत गांभीर्यानं घेतला. एकीकडे अधिकाऱ्यांना खडसावलं तर दुसरीकडे तांत्रिक अडचण सांगत सारवासारव सुरू केली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचं अक्षरशः तांडव सुरू होतं. दाहक प्रादुर्भाव, औषधींचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता आणी बेड्सच्या हाऊसफुल्ल परिस्थितीमुळं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र याच कालावधीत बळींची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणजे सरकारनं आपलं अपयश लपवण्यासाठी केलेला प्रयोग असं म्हणावं लागेल. या सर्व प्रकारामुळे  सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपामुळे शंका नक्कीच उपस्थित केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 19, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या