नाशिक, 23 जानेवारी: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील माडसांगवी याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. याठिकाणी आपल्या भावासोबत देवदर्शनाला जाणाऱ्या एका महिलेसोबत भयावह प्रकार घडला आहे. संबंधित महिलेच्या लहान मुलीने कुरकुरे मागितल्यानंतर, कुरकुरे आणण्यासाठी गाडीतून उतरलेल्या खाली उतरलेल्या (went to buy kurkure) महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन भामट्यांनी हिसकावून (Chain snatching) नेली आहे. फिर्यादी महिला कुरकुरे घेऊन कारच्या दिशेनं परत येताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपला भाऊ आणि लहान मुलीसोबत देवदर्शनासाठी गेली होती. यावेळी फिर्यादीच्या मुलीनं कुरकुरे खाण्याचा हट्ट केला. यावेळी नाशिक-औरंगाबाद रोडवरील माडसांगवी परिसरात गाडी थांबवून फिर्यादी कुरकुरे आणण्यासाठी खाली उतरल्या होत्या. त्यांनी परिसरातील एका किराणा दुकानातून कुरकुरे विकत घेतले.
हेही वाचा-झटपट श्रीमंतीचं दाखवलं स्वप्न; कोल्हापुरातील तरुणाला केलं कंगाल, 16 लाख लुबाडले
कुरकुरे घेतल्यानंतर पुन्हा गाडीकडे परतत असताना, काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आहे. यावेळी फिर्यादी महिलेनं सोनसाखळीसाठी जोरदार प्रतिकार केला. पण आसपासच्या लोकांना काही कळेपर्यंत भामटे सोनसाखळी घेऊन पसार झाले आहेत. संबंधित साखळी 21 ग्रॅम वजनाची असून याची किंमत 63 हजार रुपये इतकी होती.
हेही वाचा-महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ
हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, पीडित महिलेनं माडसांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे मागील काही काळात नाशिक जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र भामटे प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.