नाशिक, 10 जून: 'वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. आज चंद्रकांत पाटलांचा वाढदिवस असून त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवो. त्यांच्या मनात कुणा-कुणाची यादी आहे ती पाठवून द्यावी, त्यावर आपण काम करू' असा पलटवार शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केला.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर परखड मत व्यक्त केले.
'राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ठीक आहे ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावे, ते गोड माणूस आहे, अशी कोपरखळी राऊत यांनी लगावली.
IPL 2021: KKR ची टीम संकटात, जुन्या Tweets मुळे दिग्गज अडचणीत
टराजकीय घडामोडींना वेग वगैरे मला माहिती नाही. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असेल तर तो त्यांच्या पक्षातील मुद्दा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू आहे, असंही राऊत म्हणाले.
'मी काही दुजोरा देणार नाही. आजही नरेंद्र मोदी हे भारतीय पक्षाचे मोठे नेते आहे. गेल्या सात वर्षात जे भाजपला यश मिळाले आहे ते नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे झाले आहे. फोटो कोणत्या नेत्याचा वापरायचा हे कार्यकर्त्यांवर ठरलेलं असतं. त्यामुळे लोकांच्या मनात एखादा नेता असेल तर ते पुसता येत नाही', असंही राऊत म्हणाले.
तुमच्याकडे आहे हे 2 रुपयाचं नाणं तर घरबसल्या कमवा 5 लाख रुपये, वाचा काय आहे ऑफर
तसंच, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रचार करू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. ते भाजपचे नेते आहे, त्यांनी एक नेता म्हणून भाजपचा प्रचार करावा. पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते अत्यंत चुकीचे होते, अशी टीकाही राऊत यांनी केली.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं.
औरंगाबादला पावसाने झोडपले, वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, 1 गंभीर जखमी
'दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असले हे सांगता येणार नाही. वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे. फडणवीस आणि पाटलांनी पटत नाही. जर आमच्याशी मैत्री असती तर 18 महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं. उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत' असं सूचक विधानही पाटलांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut