मराठी बातम्या /बातम्या /nashik /

शेतातून घरी परतत असताना निसर्गाचा आघात; अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू

शेतातून घरी परतत असताना निसर्गाचा आघात; अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू

गेल्या काही दिवसात केवळ महाराष्ट्रच नाही तर देशात वीज कोसळल्याने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

जळगाव, 9 जून : शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या तळई गावात  ठरावीक अंतराने या दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मृतांमध्ये एका तरुणासह प्रौढाचाही समावेश आहे. भूषण अनिल पाटील (वय १८) आणि विक्रम दौलत चौधरी (वय ५७) अशी मृतांची नावे असून, दोघेही तळई गावातील रहिवासी होते.

विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण शेतात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते घरी परत येत होते. अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तळई गावावर एकच शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा-प्रेयसीची छेड काढल्यानं दिली आयुष्यभराची शिक्षा; दगडाने ठेचून केला खेळ खल्लास

काही दिवसांपूर्वी सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली होती. वैजिनाथ शामराव बरडे ( वय ३० ) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे ( रा . वय ३०) अशी मयतांची नावे आहेत. या दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व वीज चोरून वापरणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने बरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वीजेचा करंट लागून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण गेल्या अनेक दिवसात वाढले आहे.

First published:

Tags: Death, Jalgaon