मराठी बातम्या /बातम्या /nashik /

लग्न सोहळ्यावरून गावी परतणारी वऱ्हाडाची पिकअप व्हॅन नदीत कोसळली ; 2 ठार

लग्न सोहळ्यावरून गावी परतणारी वऱ्हाडाची पिकअप व्हॅन नदीत कोसळली ; 2 ठार

येवला तालुक्याकडे येत असताना निफाडमध्ये पोहोचल्यावर चालकाचा पिकअप व्हॅनवरचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी...

येवला तालुक्याकडे येत असताना निफाडमध्ये पोहोचल्यावर चालकाचा पिकअप व्हॅनवरचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी...

येवला तालुक्याकडे येत असताना निफाडमध्ये पोहोचल्यावर चालकाचा पिकअप व्हॅनवरचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी...

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 13 जुलै : नाशिक (nashik) जिल्ह्यातील निफाड (nifad) तालुक्यात लग्न सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या गावकऱ्यांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. 10 ते 12 जणांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन पुलावरून गोदावरी नदीपात्रात कोसळली आहे. या अपघातात 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 जण जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. येवल्यातील वऱ्हाडी मंडळ लग्न सोहळ्यासाठी सिन्नरला गेलं होतं.  सिन्नर इथं राहणाऱ्या उत्तम घुले यांचा मुलगा योगेश यांचा विवाह सोहळा होता.  दुपारी लग्न आटोपल्यानंतर गावी परत येत होते. येवला तालुक्याकडे येत असताना निफाडमध्ये पोहोचल्यावर चालकाचा पिकअप व्हॅनवरचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी पुलावरून गोदावरी नदीपात्रात कोसळली. नदीवरील पुलाला कठडा नसल्यानं गाडीचालकाला याचा अंदाज आला नाही, त्यामुळे थेट पाण्यात कोसळली.

अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. पिकअप व्हॅनमधील लोकांनी पटापट बाहेर उड्या टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील काही जण सुखरुपपणे बाहेर आले. मात्र, 5 वर्षीय चिमुरडी आणि एका 50 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

द्वारकाधीश मंदिरावर कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO, लोकांमध्ये रंगली ‘ही’ चर्चा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने पिकअप व्हॅन बाहेर काढण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: