Home /News /nashik /

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

ज्या रुग्णाचं बिल शासन नियमाप्रमाणे केवळ 1 लाख रुपये व्हायला हवं त्या रुग्णाला या मेडिसिटी हॉस्पिटलने तब्बल 3 लाख 45 हजाराचं बिल आकारलं होतं,

  लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने न्यूज 18 लोकमतकडे (News18 Lokmat) मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली. घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये (medicity hospital nashik) दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला आणि त्याने आपल्या वडिलांना हॉस्पिटल बिल भरत नसल्याने सोडत नसल्याची तक्रार केली.  यानंतर न्यूज 18 लोकमतची टीम रुग्णालयात दाखल झाली आणि या मुलाची तक्रार जाणून घेतली. टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती ज्या रुग्णाचं बिल शासन नियमाप्रमाणे केवळ 1 लाख रुपये व्हायला हवं त्या रुग्णाला या मेडिसिटी हॉस्पिटलने तब्बल 3 लाख 45 हजाराचं बिल आकारलं होतं,असं असतांना या रुग्णाचा मुलगा शासकीय दराने बिल भरण्यास देखील तयार होता. मात्र मुजोर हॉस्पिटल प्रशासनाने या मुलाला दाद दिली नाही. अखेर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मात्र, तेंव्हा देखील हॉस्पिटलने दारात बाऊन्सर उभे करत कुणालाच आत जाऊ दिलं नाही, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर हॉस्पिटलच्या बाहेरच ठिय्या मांडला. या नंतर तब्बल एक तासाने आमच्या प्रतिनधिंनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि त्या नंतर 5:30 वाजता गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल हे त्यांच्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही या मुलाची तक्रार जाणून घेत हॉस्पिटलला बिल शासकीय नियमा प्रमाणे आकरण्याची विनंती केली. मात्र. या पोलिसांनाही हॉस्पिटल प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे देत रुग्णाला सोडण्यास नकार दिला. हा खेळ देखील तब्बल 1 तास सुरू होता पोलिसांना हॉस्पिटल जुमानत नसल्याने आमच्या प्रतिनिधींनी नाशिक महानगर पालिकेचे मुख्यलेखा परीक्षक बी जे सोनकांबळे यांना हॉस्पिटलला पाचारण केले. या नंतर 6:30 वाजता हे अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा या अधिकार्‍यांनाही या हॉस्पिटलमध्ये आत मध्ये सोडण्यास मज्जाव केला गेला. Mutual Fund-FD मध्ये मर्यादेपेक्षा जास्त डिपॉझिट नको, येईल इन्कम टॅक्सची नोटीस मात्र नंतर आतमध्ये गेल्यानंतर या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाची सगळीच पोलखोल केली. बिलात पीपीई किट,बेड चार्जेस आणि इतर चार्जेस आवास्तव असल्याचा ठपका ठेवत 3 लाख 45 हजाराचं बिल शासनाच्या नियमां प्रमाणे 1 लाख 35 हजारचं होत असल्याचं स्पष्ट करत इतकंच बिल भरून घेऊन रुग्णाला डिस्चार्ज करण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान न्यूज 18 लोकमत आणि मनपा अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली असता बिलात ज्या कर्मचाऱ्याच्या नावे PPE किट लावले होते, त्या हॉस्पिटलमध्ये न PPE किट घातलेले कर्मचारी आढळून आले न पालिकेने ठरवून दिलेल्या 80 खाट्यातील बेडवर रुग्ण आढळून आले केवळ 20 टक्के बेडवर रुग्ण दाखल करून घेत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली.आणि अखेर न्यूज 18 लोकमतच्या पुढाकाराने आणि मनसे पदाधिकारी, पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे या रुग्णाची 7: 30 वाजता म्हणजे तब्बल 3 तासांनी या हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आली.

  Cyclone Tauktae : चक्रीवादळ सध्या आहे कुठे? पाहा LIVE cyclone tracking

  या नंतर मनपा अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवर सील करण्याची कारवाई केली जाईल असं सांगितलं, तर पोलिसांनी या रुग्णांना न्याय मिळाला, असं म्हणत तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करू, असे स्पष्टीकरण दिले आहे. तर मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मनपा आयुक्तांना या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यासाठी पत्रव्यव्हार केले जातील असं सांगितलं आणि पीडित मुलाने आपल्या वडिलांची सुटका झाल्याने न्यूज 18 लोकमतचे आभार मानले.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या