Home /News /nashik /

ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू होताच अवघ्या काही तासात झालं हाऊसफुल्ल!

ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू होताच अवघ्या काही तासात झालं हाऊसफुल्ल!

सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.

सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.

येथे ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू होताच उपचारासाठी रुग्णांची झुंबड उडाली आहे.

मनमाड, 22 एप्रिल : मनमाडमधील रेल्वे हॉस्पिटलमध्ये 30 बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू होताच उपचारासाठी रुग्णांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे कोविड सेंटर हाऊस फुल झाले तर एका रुग्णाचा मूत्यू झाला आहे. कोविड सेंटर सुरू होताच अवघ्या काही तासातच कोविड सेंटर फुल झाले. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर झाली आहे याचे विदारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान खासदार भारती पवार यांनी आज (गुरुवार) या कोविड सेंटरला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली असता येथे 15 रुग्णांना पुरेल एवढाच गॅसचा एक ड्युरा सिलेंडर उपलब्ध झाला. जर जम्बो गॅस सिलेंडर उपलब्ध झाले तर रुग्णांची संख्या वाढवता येईल अशी माहिती दिली. या डीसीएचसी सेंटरला जास्तीतजास्त सिलेंडर मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.भारती पवार यांनी आश्वासन दिले आहे. हे ही वाचा-महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनमाड शहर परिसरासह नांदगाव तालुक्यात थैमान घातला असून रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून भटकंती करून देखील अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. परिस्थित दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे पाहून मनमाड शहरातील रेल्वे हॉस्पिटल ताब्यात घेतल्यानंतर तेथे 30 बेडचे डीसीएचसी सेंटर उभारण्यात आले. बुधवारी या कोविड सेंटरचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. उद्घाटन होताच उपचारासाठी रुग्णांची झुंबड उडाली होती. मात्र सध्या सर्वत्र गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे या कोविड सेटरला ऑक्सिजनचे केवळ एकच ड्युरा सिलेंडर मिळाले. त्यामुळे या सेंटरमध्ये फक्त 15 रूग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. जर जम्बो गॅस सिलेंडर उपलब्ध झाले तर आणखी 15 रुग्णांना दाखल करण्याची येथे व्यवस्था आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान खासदार डॉ.भारती पवार यांनी या कोविड सेंटरला भेट देवून पाहणी करून डॉक्टर, पालिका अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार उदय कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.गोविंद नरवणे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ गोरे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी राजाभाऊ पवार, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी, नितीन अहिरराव, अकबर शहा, जितू शिंदे, आदी उपस्थित होते.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona updates, Covid-19 positive, Nashik

पुढील बातम्या