भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर नाशकातील वातावरण तापलं, भाजपने भुजबळांवर केला गंभीर आरोप

भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर नाशकातील वातावरण तापलं, भाजपने भुजबळांवर केला गंभीर आरोप

Nashik News: नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 26 नोव्हेंबर : नाशिकमधील (Nashik) भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (BJP Amol Eghe) यांच्या हत्येनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार, पदाधिकारी यांचे ठिय्या आंदोलन सुरू (BJP protest after murder of party worker) केले आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले आहेत.

छगन भुजबळांवर गंभीर आरोप

युनियनच्या वादातून अमोल इघे यांची हत्या झाल्याचा दावा आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त शहर अशांत करत आहेत असाही गंभीर आरोप भाजपने केला आहे. भाजप पदाधिकारी आक्रमक झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कुमक मागवली आहे.

नाशिक शहर प्रचंड अस्वस्थ आहे. परिस्थिती खूप संयमाने आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. या विषयाकडे राजकारण म्हणून पाहून चालणार नाही. गेल्या दोन तीन महिनयांपासून नाशिककर चिंतेत आहेत. रोज सकाळी उठल्यावर एक हत्या झाल्याचं ऐकायला मिळतं. याचं यांना काहीही वाटत नाही. या शहरात सुपारी घेणाऱ्यांना अभय मिळालेलं आहे. या शहराचे पालकमंत्री आणि शहराचे पोलीस आयुक्त हे शहर अशांत करत आहेत असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.

वाचा : नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

हत्येमागचं नेमकं कारण काय?

भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या कऱण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशकात हत्या सत्र सुरुच 

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्या सत्र सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आज भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा : PSI ची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वी आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकरची हत्या

ऐन दिवाळीत नाशकात एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली होती. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर (Pooja Ambekar) असं असल्याची माहिती समोर आली होती. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या. दिवाळीत रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे.

संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Published by: Sunil Desale
First published: November 26, 2021, 12:07 PM IST

ताज्या बातम्या