Home /News /nashik /

लेकीच्या आत्महत्येनं माहेरची माणसं संतापली, सासऱ्याचे घर दिले पेटवून!

लेकीच्या आत्महत्येनं माहेरची माणसं संतापली, सासऱ्याचे घर दिले पेटवून!

कार घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावे यासाठी पती, सासू, सासरे, नंदा अश्विनीला सतत त्रास देत होते.

कार घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावे यासाठी पती, सासू, सासरे, नंदा अश्विनीला सतत त्रास देत होते.

कार घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावे यासाठी पती, सासू, सासरे, नंदा अश्विनीला सतत त्रास देत होते.

चांदवड, 25 एप्रिल : गाडी घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन (married woman Suicide ) आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील (nashik) काजीसांगवी येथे घडली. या घटनेनंतर संतापलेल्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांचे घर पेटवून दिले. या प्रकरणी मयतेचे वडील रामदास सरोदे (नांदूरखुर्द) यांनी पती, सासरे, सासू, नंदा अशा एकूण सात जणांविरोधात फिर्याद दिल्याने त्यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील नांदूरखुर्द येथील रामदास एकनाथ सरोदे यांची मुलगी अश्विनीचा विवाह १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून अश्विनीला पती सचिन ठाकरे, सासरे दिलीप ठाकरे, सासु जयाबाई ठाकरे, नंदा पुनम गुंजाळ, ज्योती पगार, वर्षा शिरसाठ आदी शारीरिक, मानसिक त्रास देत होते. (UPSC Tips: तुम्हालाही IAS व्हायचंय? मग 'हे' महत्त्वाचे गुण तुमच्यामध्ये आहेत ना?) या त्रासाबाबत अश्विनीने माहेरच्या मंडळीना फोनवरुन कळवले देखील होते. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी येऊन समजूत घातली होती. कार घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावे यासाठी पती, सासू, सासरे, नंदा अश्विनीला सतत त्रास देत होते. यासाठी 1 लाख व 30 हजार रुपये अश्विनीचे सासरे यांच्याकडे अश्विनीचे वडील रामदास सरोदे यांनी दिले होते. मात्र उर्वरित पैसे न दिल्याने सासरची मंडळी अश्विनीचा शारीरिक, मानसिक त्रास करीत होते. सासरच्या या त्रासाला कंटाळून अश्विनीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. या फिर्यादीवरून पती सचिन ठाकरे, सासरे दिलीप ठाकरे, सासु जयाबाई ठाकरे, पुनम गुंजाळ (नाशिक), ज्योती पगार (रा. मुसळगाव ता. सिन्नर), वर्षा शिरसाठ (रा. दिघवद), बाबुराव रेवजी शिंदे (रा. नैताळे, निफाड) यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना चांदवड न्यायलयात नेले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले. (आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त!) दरम्यान, मयत अश्विनी हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांचे घर पेटवून दिले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे, धान्य, पैसे, सोने, मोटरसायकल आदी जळून खाक झाले. या घटनेबाबत भूषण गंगाधर ठाकरे (३८, काजीसांगवी) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने मयत विवाहितेच्या माहेरचे परसराम निवृत्ती पवार (रा. नैताळे, ता. निफाड), दीपक निवृत्ती भालसिंगे, लहानू शिवराम झाल्टे, संदीप निवृत्ती भालसिंगे (मनमाड), चेतन लहानू झाल्टे (वागदर्डी) एक अज्ञात अशा ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात नेले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या