नाशिक, 30 सप्टेंबर : मोठ्या लाचप्रकरणात बड्या पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं आहे. नाशिक (latest Nashik News) ग्रामीणचा एलसीबी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे याला तब्बल 4 लाखांच्या लाच प्रकरणात (Nashik bribery case) ताब्यात घेण्यात आल्यानं नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षकच मोठे भक्षक बनले असल्याचे या घटनेवरून दिसत आहे.
हे वाचा - मी धमकी देत नाही, मात्र मागणी जरूर करतो; शिवसेनेच्या आरोपांवर भुजबळांचा विनंतीवजा इशारा
बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकण्याच्या बहाण्याने पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यानं तिथंच सेटलमेंट चालू केली होती. एका बुकीकडे त्याने तब्बल 4 लाखाची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती बुकी आणि शिंदे याच्यात 3 लाखाची डील फिक्स झाली. या प्रकरणात एक वाहनांचा डीलर संजय खराडे हा मध्यस्थाचं काम करत होता. त्यालाही एसीबीने ताब्यात घेतलं आहे. कायद्याचे रक्षकांना अशा प्रकारची हाव सुटत असल्यानं नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.