Home /News /nashik /

...म्हणून सर्पमित्राची सटकली; पकडलेला नाग सोसायटीत सोडून रहिवाशांची केली 'हवा टाइट'

...म्हणून सर्पमित्राची सटकली; पकडलेला नाग सोसायटीत सोडून रहिवाशांची केली 'हवा टाइट'

एका सोसायटीत शिरलेल्या नागाला सर्पमित्राने सुरक्षितपणे पकडलं पण रहिवाशांच्या एका चुकीमुळे सर्प मित्राने नागाला पुन्हा सोसायटीत सोडून (snake catcher leave snake in society) घटनास्थळावरून धूम ठोकली आहे.

    नाशिक, 12 ऑक्टोबर: नाशिक शहरातील एका गृहनिर्माण सोसायटीत विषारी नाग निघाला होता. या नागाला सर्पमित्राने सुरक्षितपणे पकडलं पण रहिवाशांच्या एका चुकीमुळे सर्प मित्राने नागाला पुन्हा सोसायटीत सोडून (snake catcher leave snake in society) घटनास्थळावरून धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. सर्पमित्रांने पकडलेला नाग पुन्हा सोसायटीत सोडल्याने रहिवाशांचा बराच काळ 'हवा टाइट' झाली होती. त्यानंतर रहिवाशांनी दुसऱ्या एका सर्पमित्राला बोलावून नागाला सुरक्षितपणे पकडायला लावलं आहे. त्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नेमकं काय घडलं? नाशिक येथील पाथर्डी फाट्यावरील एका गृहनिर्माण सोसायटीत विषारी नाग निघाला होता. नागाला पाहून रहिवाशांमध्ये घाबरगुंडी पसरली होती. त्यामुळे त्यांनी नागाला पकडण्यासाठी एका सर्पमित्राला पाचारण केलं. रहिवाशांनी फोन केल्यानंतर तातडीनं सर्पमित्र देखील घटनास्थळी दाखल झाला. यानंतर सर्पमित्राने नागाला शोधून सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण सर्पमित्राच्या मागणीप्रमाणे पैसे देण्यास रहिवाशांनी नकार दिला. हेही वाचा-कुत्र्यासाठी त्याने भरधाव ट्रेनसमोर मारली उडी आणि...; धडकी भरवणारा VIDEO सर्पमित्राने नागाला पकडल्याच्या बदल्यात रहिवाशांकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. पण सोसायटीतील महिला रहिवाशांनी सर्पमित्राच्या हातावर दोनशे-तीनशे रुपये टेकवले. यामुळे सर्पमित्राचा पारा चढला. यामुळे त्याने पकडलेल्या नागाला सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या दाराला अडकवलं आणि घटनास्थळावरून निघून गेला. सर्पमित्राने केलेला कहर पाहून रहिवाशांमध्ये घाबरगुंडी पसरली. हेही वाचा-बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू यानंतर रहिवाशांनी दुसऱ्या एका सर्पमित्राला संपर्क साधून बोलावून घेतलं. दुसऱ्या सर्पमित्राने सोसायटीतील नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिलं आहे. यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Snake, नाशिक

    पुढील बातम्या