नाशिक, 11 ऑगस्ट: कोणत्या जिल्ह्याची मिसळ सर्वात भारी यावरून सोशल मीडियावर अनेकदा वाद होत असतो. मिम्स किंवा फोटोच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याचे मिसळप्रेमी आमचीच मिसळ कशी चांगली यावरूनही वाद करतात. कधी नाशिकची मिसळ भारी तर कधी कोल्हापूरची मिसळ भारी किंवा पुण्याची मिसळ भारी अशी चर्चा तुमच्याही कानावर आली असेल. पण नाशिकच्या मिसळला (Nashik Misal) राज्यभर लौकिक मिळवणून देणाऱ्या मिसळवाल्या आजी (Misalwalya aaji) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताबाई मोरे (Sitabai More passed away) यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला आहे. सीताबाई यांच्या जाण्यानं मिसळप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या झणझणीत मिसळनं खवय्यांना भुरळ पाडणाऱ्या 94 वर्षीय सीताबाई मोरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अमरधाम याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मागील 75 वर्षांपासून त्यांनी खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मिसळवाल्या आजीनं आपल्या झणझणीत मिसळ राज्यभर लौकिक मिळवला होता. मिसळच्या रुपानं नाशिकच्या खाद्य संस्कृतीला सीताबाईंनी नवीन ओळख मिळवून दिली होती. नाशिकची मिसळ नगरी अशी ओळख मिळवून देण्यात सीताबाई यांचं योगदान महत्त्वाचं होतं.
हेही वाचा-दिसताच गळ्यावर सूज करून घ्या टेस्ट; कॅन्सर, थायरॉईडचं असू शकतं लक्षण
जुन्या नाशिक या छोट्याशा भागातून सुरू केलेला मिसळचा व्यवसाय अल्पावधीतच पूर्ण नाशकात प्रसिद्ध झाला होता. मिसळाल्या आजींची मिसळ खाण्यासाठी अनेक ठिकाणचे लोकं आवर्जून त्यांची मिसळ खाण्यासाठी येत असतं. संपूर्ण शहरात त्यांच्या मिसळची किर्ती पसरल्यानंतर अल्पवधीत त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे आल्या आहे. त्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवत नेला. सध्या नाशकात त्यांच्या तीन शाखा आहेत.
हेही वाचा-‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला
सीताबाई मोरे यांनी पतीच्या आजारपणामुळं कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी हा मिसळ व्यवसायाचा पर्याय निवडला होता. पण मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपलं छोटंसं खाद्याचं साम्राज्य निर्माण केलं होतं. नातवंड-पतवंड आल्यानंतरही मिसळवाल्या आजी सीताबाई मोरे या आपल्या हॉटेलात कार्यरत असायच्या. त्याचं मंगळवारी वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांसोबतच मिसळप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.