Home /News /nashik /

नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन, सकाळीच वडिलांनी सोडले प्राण

नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन, सकाळीच वडिलांनी सोडले प्राण

मोनाली गोऱ्हे यांच्या वडिलांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, आज सकाळीच त्यांचे निधन झाले.

    नाशिक, 20 मे : नाशिकमध्ये  (Nashik) कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंतेत भर घालत आहे.  भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा नेमबाज संघाच्या प्रशिक्षक आणि शूटर मोनाली गोऱ्हे (Shooter Monali Gorhe) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांच्या वडिलांचेही कोरोनामुळे निधन झालं. मोनाली गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील सदस्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. त्यांच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.  त्यांच्यावर नाशिक शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. VIDEO: पाणी कधी, केव्हा आणि कसं प्यावं? पाहा प्राजक्ता माळीनं दिलेल्या खास टीप्स पण, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. मोनाली यांच्यावर सुद्धा उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, दुपारी त्यांनीही प्राण सोडले.  पित्यापाठोपाठ मोनाली यांचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चिंतेत भर! कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा हल्ला, वाचा लक्षणं मोनाली गोऱ्हे या भारताच्या युवा नेमबाज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या. तसंच श्रीलंकेच्या नेमबाज संघाच्या त्या प्रशिक्षक सुद्धा होत्या. त्यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या