मराठी बातम्या /बातम्या /nashik /धक्कादायक VIDEO, पर्यटक कोरोनाला विसरले; त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडावर रांगाच रांगा

धक्कादायक VIDEO, पर्यटक कोरोनाला विसरले; त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडावर रांगाच रांगा

नाशिकमध्ये कोरोनाने कहर केला होता, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र असे असतानाही नाशिकमध्ये पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

नाशिकमध्ये कोरोनाने कहर केला होता, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र असे असतानाही नाशिकमध्ये पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

नाशिकमध्ये कोरोनाने कहर केला होता, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र असे असतानाही नाशिकमध्ये पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

नाशिक, 14 जून : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप पूर्णपणे गेला नाही, याबाबत वारंवार राज्य शासनाकडून सांगूनदेखील नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडावरील आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर तोंडावर मास्कही लावला नव्हता. अशा परिस्थितीमुळे पुन्हा कोरोना फोफावण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ( big crowd in Harihar fort of Trimbakeshwar nashik)

नाशिकमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसवत अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी उसळल्याचे पाहायला मिळत आहे. अशा पर्यटकांवर वेळीच आवर घालणं दरजेचं आहे. अन्यथा कोरोना पुन्हा डोकं वर काढण्यास वेळ लागणार नाही. त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. गडावर अक्षरश: रांगा लागल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना पर्यटकांचा उत्साहीपणा घातक ठरू शकतो. येथे त्र्यंबकेश्वर पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली आहे. या गर्दीमुळे पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा-'या' जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट; पर्यटकांच्या गर्दीमुळे रुग्णवाढीची भीती

राज्यातील कोरोना (Coronavirus)  रुग्णांचा आकडा कमी होण्याचा वेग मंदावला आहे. रविवारीही (Sunday 13th June)  जवळपास शनिवार एवढेच नवे रुग्ण आढळून आले. रुग्ण बरं होण्याची संख्या मात्र घटली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वाढलेली रुग्णसंख्या अडचणीचा विषय ठरली आहे. विशेषतः कोल्हापूरनं (Kolhapur) राज्याच्या चिंता वाढवल्या आहेत. रविवारीही 1500 पेक्षा अधिक रुग्ण आणि 65 मृत्यू अशी स्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Coronavirus cases, Nashik