Home /News /nashik /

आता चक्क महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचेच काढले बनावट आदेश

आता चक्क महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचेच काढले बनावट आदेश

खळबळनजक ! आता चक्क महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचेच काढले बनावट आदेश (Photo: Rfd.maharashtra.gov.in)

खळबळनजक ! आता चक्क महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचेच काढले बनावट आदेश (Photo: Rfd.maharashtra.gov.in)

महसूल खात्यातील अधिखाऱ्यांच्या बनावट पदोन्नती करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 8 जानेवारी : पोलिसांना वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकारी भरतीच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं. या सर्व घटना ताज्या असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातील महसूल अधिकाऱ्यांच्या (Revenue Department officer) पदोन्नतीचे बनावट आदेश काढल्याचं समोर आलं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. महसूल खात्यात अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. महसूल मंत्री यांचे सचिव रामदास खेडकर यांच्यासह उमेश महाजन संकेत चव्हाण मनीषा वाजे धनंजय निकम या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढण्यात आले आहेत. बनावट आदेशाने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस शासन आदेश प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यासाठी महसूल विभागाने मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं, अपर जिल्हाधिकारी या संवर्गातील अदिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत समायोजित करुन पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना देणेबाबतचा दिनांक 6 जानेवारी 2022 रोजीचा आदेश निर्गमित झाल्याची बाब महसूल मंत्री यांच्या कार्यालयाकडून या विभगाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. वाचा : भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी सदर आदेश हा पूर्णपणे बोगस असून सदर आदेश खोट्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे. सदर आदेश व अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही महसूल व वन विभागामार्फत करण्यात आलेली नाही. तसेच, अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही महसूल व वन विभागामार्फत करण्यात आलेली नाही. तसेच, अशा प्रकारचा कोणताही शासन आदेश महसूल व वन विभागामार्पत निर्गमित करण्यात आलेला नाही. याबाबत नमूद करण्यात येते की, भारतीय प्रशाककीय सेवेत पदोन्नतीने नियुक्ती देणे, हा विषय महसूल व वन विभागाशी संबंधित नसून सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित आहे. या सर्व बाबी पाहता, सदर प्रकरणाची चौकशी करुन पौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कुठल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश? रामदास खेडकर कार्यरत पदनाम - खासजी सचिव महसूल समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - प्रधान खासजी सचिव महसूल उन्मेश महाजन कार्यरत पदनाम - अप्पर जिल्हाधिकारी गडचिरोली समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - जिल्हाधिकारी गोंदिया संकेत चव्हाण - कार्यरत पदनाम - अतिरिक्त मनपा आयुक्त ठाणे समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - अतिरिक्त मनपा आयुक्त अ श्रेणी ठाणे मनपा मनिषा वाजे कार्यरत पदनाम - अपर जिल्हाधिकारी अमरावती समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - अतिरिक्त मनपा आयुक्त अ श्रेणी अमरावती मनपा धनंजय निकम कार्यरत पदनाम - अपर जिल्हाधिकारी भंडारा समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - जिल्हाधिकारी भंडारा
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Nashik

    पुढील बातम्या