Home /News /nashik /

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ

घरात रंगकाम करायचे आहे, त्यामुळे जाऊन येतो असा निरोप त्यांनी पत्नीला दिला.

    नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेचे (Shivsena)पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या (Panchvati Police) हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक (Umesh Naik) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. उमेश नाईक हे काळाराम परिसरात राहत होते. त्यांचे जुने घर हे नागचौक परिसरात आहे. शुक्रवारी उमेश नाईक आपल्या पत्नीला जुन्या घरी जात असल्याचे सांगितले. घरात रंगकाम करायचे आहे, त्यामुळे जाऊन येतो असा निरोप त्यांनी पत्नीला दिला. नागचौक येथील जुन्हा घरी पोहोचल्यानंतर उमेश यांनी घरातील स्लॅबला दोर लावून गळफास घेतला. चिमुरड्यांचंही बनवा Aadhar Card! 5 वर्षाखालील मुलांचं आधार बनवण्याची प्रक्रिया बराचं वेळ झाल्यामुळे उमेश नाईक घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी फोन करून विचारणा केली, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी जुन्या घरी जाऊ पाहणी केली असता उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. Corona vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं? गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत असल्यामुळे चिंतातूर होते. त्यामुळे गळफास लावून उमेश यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik, नाशिक

    पुढील बातम्या