कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! COVID-19 मुळे शिवसेनेच्या नगरसेविकेचा मृत्यू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! COVID-19 मुळे शिवसेनेच्या नगरसेविकेचा मृत्यू

COVID-19 Update: मालेगावमध्ये (Malegaon) कोरोनाची आकडेवारी वाढतीच आहे. दरम्यान मालेगावमधील शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांना देखील कोरोनानं गाठलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

  • Share this:

मालेगाव, 25 एप्रिल: कोरोनाचे संक्रमण (Coronavirus Pandemic) दिवसेंदिवस वाढू लागले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of COVID-19) अनेकांचे बळी गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातही (Corona Updates in Nasik) कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. मालेगावमध्ये (Malegaon) देखील कोरोनाची आकडेवारी वाढतीच आहे. दरम्यान मालेगावमधील शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांना देखील कोरोनानं गाठलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री सामान्य रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीमती बच्छाव यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र तीव्र लक्षणे नसल्याने गृहविलगीकरणातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

(हे वाचा-ICU मध्ये असणाऱ्या आईला जेव्हा शाहरुख म्हणाला होता,'मी दारु प्यायला सुरू करेन..')

दोन आठवड्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातूनच आणखी एका नगरसेविकेच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. नाशिकमध्ये नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे (Kalpana Pandey) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पांडे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. शिवसेनेच्या प्रभाग 24 मधील विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहायच्या. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कल्पना पांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचाल सुरू होते.

(हे वाचा-जग कोरोनाने हादरलं! आता अन्य विषाणूजन्य आजारांवरही पुन्हा संशोधन सुरू)

नाशिक जिल्ह्यात दररोज साधारण 4 ते 5 हजार नव्या रुग्णांची भर पडते आहे. ग्रामीण भागात मालेगावमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मालेगाव, निफाड, सिन्नर या भागातून मृत्यूची आकडेवारीही समोर येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देखील मालेगावमध्ये अधिक हानी झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये खबरदारी बाळगणं अत्यावश्यक आहे, पण तसे होताना दिसत नाही आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 25, 2021, 7:41 AM IST

ताज्या बातम्या