मनमाड, 14 जून: सत्तेतून पायउतार झाल्यामुळे अनेक मंत्री आता दिसेनासे झाले आहे. भाजपसोबत ( BJP) घरोबा करून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर (mahadev Jankar) यांनी दुग्धविकास मंत्रिपद भुषवले. पण सत्तेतून पायउत्तार झाल्यानंतर महादेव जानकर हे मीडियापासून दोन हात दूर राहत आहे. आता भगवी शॉल घालून महादेव जानकर अंकाई किल्ल्यावर दोन दिवस मुक्कामी असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
माजी मंत्री महादेव जाणकर यांनी मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात 2 दिवस मुक्काम केला. यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले प्रभू रामचंद्र, ऋषी अगस्तीमुनींच्या मंदिर आणि मोठे बाबाच्या दरगाह इथं जाऊन दर्शन घेतले. शिवाय महंत ज्ञानगिरी बाबा यांच्यासोबत मनसोक्तपणे गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जाणकर यांनी केला अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात 2 दिवस मुक्काम pic.twitter.com/xxqyEw0KzF
— News18Lokmat (@News18lokmat) June 14, 2021
विशेष म्हणजे, महादेव जानकर यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता तर पाळलीच शिवाय मीडिया आणि लोकांना देखील भेटण्याचे टाळले. अंगावर भगवी शॉल घालून जाणकार यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. मात्र अचानक आणि गुपचूपपणे ते या किल्ल्यावर दोन दिवस का थांबले. त्यांच्या मनात काय चाललं. ते अस्वस्थ तर नाही ना ? मनाला शांती मिळावी यासाठी ते या किल्ल्यावर आले होते का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सुनील गावसकरांच्या कोचचा ICC कडून सन्मान, Hall of Fame मध्ये समावेश
विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर महादेव जानकर हे भाजपच्या आंदोलनात एखाद्यावेळेस सहभागी होताना दिसले. अलीकडे, पंकजा मुंडे यांच्यासोबत ते भगवानगडावर हजर होते. त्यानंतर आता अंकाई किल्ल्यावरचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.