Home /News /nashik /

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाला नवे वळण

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाला नवे वळण

त्यामुळे पाच लाखांचा हिशेब लागला नाही. या प्रकरणी करन्सी प्रेसनं दोघांनाही निलंबित केलं आहे.

नाशिक, 27 जुलै : नाशिकमधील भारतीय चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून (currency note press) 5 लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे.  मुळात  5 लाख रुपयांच्या नोटा (Rs 5 lac  worth notes missing) या चोरीला गेल्याच नसल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. करन्सी प्रेसमध्ये कर्मचाऱ्यांनी चुकून रॅक बदलले होते, त्यामुळे हा घोळ झाल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार,  12 फेब्रुवारी 2021 ला 160 क्रमांकचं 1 पॅकेट गायब झाल्याचं उघडकीस आलं होतं. मात्र चौकशी अंतर्गत तपास न लागल्यानं पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा  2 सुपरवायझर्सवर पोलिसांनी ठपका ठेवला होता.

'...नितीन गडकरी साहेब मनापासून आभार', अमोल कोल्हेंचं सूचक ट्वीट

कटपॅक विभागातील 2 सुपरवायझर्स यांनी 5 लाख रक्कमेचं रॅक बदलले होते. हे रॅक चुकून बदलले गेले, असं दोघांनी चौकशीत पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे पाच लाखांचा हिशेब लागला नाही.  या प्रकरणी करन्सी प्रेसनं दोघांनाही निलंबित केलं आहे. ही मानवी चूक का जाणूनबुजून केलेलं कृत्य? या प्रकरणात सिनिअर मॅनेजर सहभागी आहे का ? याचा तपास पोलीस करत आहे. काय आहे प्रकरण? देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून 12 जुलै रोजी चोरी झाल्याचं समोर आलं होतं. एवढी सुरक्षा व्यवस्था असूनही पाच लाख रुपयांचा हिशेब लागत नसल्यानं हे पैसे नेमके कुठे गेले असा प्रश्न प्रशासनाला पडला.

प्रेमासाठी वाट्टेल ते! मलायका अरोराच्या प्रेमात अर्जुन कपूरने उधळले 23 कोटी रु.

नाशिकमधील संबंधित करन्सी नोट प्रेसमध्ये भारतीय चलनी नोटांची छापाई केली जाते. याठिकाणी वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष किमतीच्या नोटा छापल्या जातात. त्यामुळे या कारखान्याला अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर याचं कारखान्यात दिवसरात्र छपाई करून देशातील नागरिकांना नोटा पुरवण्यात आल्या होत्या.  छपाईच्या कारखान्यातून चलनी नोटा गायब झाल्यानं गोपनीयरीत्या विभागीय चौकशी सुरू होती. पण, हिशेबच न लागत असल्यामुळे सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या