Home /News /nashik /

Nashik: मजुरीसाठी बाहेरगावी गेल्यास नाही मिळणार रेशन, 10 हजारांचा होणार दंड; ग्रामपंचायतीचा अजब फतवा

Nashik: मजुरीसाठी बाहेरगावी गेल्यास नाही मिळणार रेशन, 10 हजारांचा होणार दंड; ग्रामपंचायतीचा अजब फतवा

Crime in Nashik: शेतात काम करण्यासाठी मजूर कमी पडत असल्याने आपल्या गावातील मजुरांनी आपल्याच गावातील शेतात काम करावं, यासाठी ग्रापंचयतींकडून अजब-गजब फतवे काढले जात आहेत.

मनमाड, 22 डिसेंबर: कामधंदा नसल्यानं देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याची ओरड सर्व थरातून केली जाते. असं असताना ग्रामीण भागातील शेतात मात्र भरपूर काम असून शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याचं चित्र मालेगावसह मनमाड आणि नाशिकच्या ग्रामीण भागात निर्माण झालं आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर कमी पडत असल्याने आपल्या गावातील मजुरांनी आपल्याच गावातील शेतात काम करावं, यासाठी ग्रापंचयतींकडून अजब-गजब फतवे काढले जात आहेत. खरंतर, गेल्या तीन वर्षांपासून मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, सटाणा, बागलाण, देवळा यासह नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. यंदा तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नाशकातील नदी-नाले, विहिरी आणि शेततळ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. कांदे, गहू यासह रब्बीच्या हंगामातील इतर पिकांची लागवड करण्यासाठी शेताची मशागत केल्यानंतर, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते यांची व्यवस्था करून ठेवली आहे. हेही वाचा-पतंग पकडण्याच्या शर्यतीत जीवनाची शर्यत हरला; नाशकात चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट पण ग्रामीण भागात शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. वाढीव मजुरी देऊन देखील शेती कामासाठी मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे आता थेट ग्रामपंचायती मैदानात उतरल्या आहेत. आपल्या गावातील मजुरांनी गावातील शेतीतच कामं करावी, यासाठी वेगवेगळे नियम, ठराव करून मजुरांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. मालेगावच्या तळवाडे येथील ग्रामपंचायती देखील अशाच प्रकारचा फतवा काढला आहे. ज्यामध्ये बाहेर गावी जाणाऱ्या मजुरांना गावात रेशन, किराणा यासह इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा-'माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे...' स्टेटस ठेवून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल याशिवाय ज्या वाहनातून हे मजूर बाहेरगावी कामाला जातील, त्या वाहनाला 10 हजार रुपयांचा दंड केला जाईल, असंही संबंधित ठरावात नमूद करण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीच्या अशा फतव्यामुळे स्थानिक मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे. काहींनी या ठरावाला विरोध केला. या ठरावामुळे आमच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आल्याचं देखील काही जणांचं म्हणणं आहे. या प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर काही सामाजिक संघटनानी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या ठरावाला विरोध केला आहे. तसेच सरपंच आणि सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील संघटनांनी केली आहे. हेही वाचा-पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय; क्रूरता पाहून पोलिसांचा उडाला थरकाप नागरिकांमधील वाढता रोष पाहून ग्रामपंचायतीने अखेर हा ठराव रद्द केला आहे. तसेच त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीर व्यक्त केली आहे. ठराव रद्द करण्यात आला असला तरी मजुरांमध्ये मात्र कारवाईची भीती कायम असल्याचं दिसून येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime news, Nashik

पुढील बातम्या