मराठी बातम्या /बातम्या /nashik /

"निवडणुकीची थट्टा लावलीय, नुसता खेळ सुरू आहे" बहुसदस्यीय प्रभाग समितीवरुन राज ठाकरे संतापले

"निवडणुकीची थट्टा लावलीय, नुसता खेळ सुरू आहे" बहुसदस्यीय प्रभाग समितीवरुन राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on three members ward in municipal corporation election: बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

Raj Thackeray on three members ward in municipal corporation election: बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

Raj Thackeray on three members ward in municipal corporation election: बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई, 23 सप्टेंबर : राज्यातील महानगरपालिकामध्ये बहुसदस्यीय प्रभागाची (Multi members ward in Corporation election) तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) घेण्यात आला. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावर प्रतिक्रिया देत म्हटलं, सत्ता काबीज करण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी म्हटलं, या विषयाबद्दल पाच वर्षांपूर्वी देखील मी बोललो बोतो. ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा त्यांनी दोनचा एक प्रभाग अशी पद्धत सुरू केली. त्यानंतर युतीची सत्ता आल्यावर चारचा प्रभाग केला. आता मविआ सरकारने ठरवलंय की तीनचा प्रभाग तयार करायचा. अशी कुठलीही पद्धत देशात नाहीये. खासदारकीपासून ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार अशी पद्थत आहे. महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झालं? त्याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे. त्यानुसार आपआपल्या पद्धतीने प्रभाग करणे आणि पैसा ओतून निवडणुका जिंकणे.

सेना-काँग्रेसच्या दबावामुळे मुंबई वगळता राज्यात 3 चा प्रभाग निर्णय मंजूर!

राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान कऱण्याऐवजी तीन-तीन बटणं का दाबायची? आपल्याला हवंय त्या प्रमाणे प्रभाग करायचे. हे योग्यच नाहीये. खरंतर निवडणूक आयोगाने यावर अॅक्शन घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कायदा वेगळा आणि देशाचा कायदा वेगळा असं काही आहे का? उद्या तुम्ही तीन-तीन आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का? तीन-तीन खासदारांचा प्रभाग करणार आहात का? ग्रामपंचायतीत एक प्रभाग चालतो.

माझी जनतेला विनंती आहे की, लोकांनी कोर्टात जावं. दोन, तीन किंवा चारचा प्रभाग असेल... कुठचाही नगरसेवक कामाचा प्रस्ताव सादर केला तर दुसरा नगरसेवक त्याला विरोध करतो. कामे होत नाहीत. निवडणुकीची थट्टा लावली आहे. उद्या लोकांनी ठरवलं की नगरसेवकाला भेटायचं आहे तर कुठल्या नगरसेवकाला भेटायचं त्यांनी? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मोठी बातमी ! काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- संघटनात्मक नेमणूक करण्यासाठी हा दौरा

- निवडणुकांना अजून वेळ आहे

- 15 दिवसांनी मी पुन्हा येणार

- समन्वयक या नवीन पदाची निर्मिती

- काँग्रेस-राष्ट्रवादीनं 2012 ला 2 चा प्रभाग केला

- भाजप-सेनेनं त्यानंतर 4 चा केला

- मुळात देशात अशी पद्धत कुठेच नाही

- सत्ता काबीज करण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा घाट

- जनतेला गृहीत धरतात

- निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी

- हा नुसता खेळ सुरू आहे

- फक्त पालिका याच स्थानिक स्वराज्य संस्थेलाच प्रभाग पद्धत का ?

- लोकांनी कोर्टात चॅलेंज करायला हवा

- निवडणूक मॅनेज करण्यासाठी असा निर्णय सरकारने घेतला का ?

- मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी हे ईडी वगैरे खेळ,आरोप-प्रत्यारोप

- माझा कालचा मुंबई-नाशिक प्रवास खड्डे असलेल्या रस्त्यांवर

- आणि या खड्ड्यांमध्ये चक्क 4/5 स्पीड ब्रेकर लागले

- शरियत सारखा कायदा आणा मग महिलांवर अत्याचार थांबतील

- कायद्याची भीती नाही

- माजी गृहमंत्र्यांना  ईडीची भीती नाही

- ईडीला वेड्यात काढलं

- होर्डिंग्ज नाही लावायला हवी

- शहर विद्रुप होतं

- मात्र, झालं असं की फक्त आमचीच लावायची नाही

महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

राज्यातील महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापि, कोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

First published:

Tags: MNS, Nashik, Raj Thackeray