Home /News /nashik /

मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रीतम मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रीतम मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे'

नाशिक, 08 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Reshuffle) झाल्यानंतर भाजपमध्ये कुठे खुशी तर कुठे गम आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्यासह मुंडे गटात नाराजी पसरली आहे. पण,  मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली. नाशिकमध्ये शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली. 'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज, हे कोण म्हणत आहे. अशी काहीही चर्चा नाही. मंत्रिपद वाटपाचा निर्णय, पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतला जात असतो. त्यामुळे मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही' असं फडणवीस म्हणाले. शाळेची पहिली घंटा ! वाचा कोणकोणत्या राज्यात कशी आहे शाळेची परिस्थिती तसंच, नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाले आहे. ते  त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात सामील झाले आहे. ते चांगल्या प्रकार काम करतील, असंही फडणवीस म्हणाले. एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, 'मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. एकनाथ खडसे प्रकरणात मी काय बोलणार. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल' असंही फडणवीस म्हणाले. मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट व्हायरल दरम्यान, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते, हे ठणकावून सांगण्यात आले आहे. ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे. 'साज ह्यो तुझा..', प्रिया मराठेचं नऊवारीतील सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोका 'तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही. हे सारं प्रस्थापित शक्ती केंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे' असं म्हणत समर्थकांनी भावनिक सादही घातली आहे. काय आहे ती पोस्ट ? 24-25 मे 2014,खा.गोपीनाथ मुंडे यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश होणार नाही अशा चर्चा. हो हो नाही नाही करत अखेर साहेबांचा शपथविधी झाला.लोक आनंदाने वेडेपिसे झाले. रड रड रडले. आज प्रीतमताईंचा समावेश झाला असता तर जवळपास तेच चित्र राज्यभर पहायला मिळालं असतं ! असं का झालं नसेल बर ! कुरघोडींचं राजकारण की अजून काही ? आठवतो का तुम्हाला मुंडे भगिनींचा प्रवास ? • पुन्हा संघर्ष यात्रेस गावोगावी अभुतपुर्व प्रतिसाद ,भगवानगडावर 2014 साली लाखोंचा भावनिक समुदाय ऊरात धडकी भरवणारा. • 2014 साली मुंबईत मंत्रिमंडळात तुमच्या नावाची घोषणा होताच उपस्थित सर्व महामहीमांपेक्षा अधिक प्रतिसाद. • 2014 लोकसभा पोटनिवडणुकीत सर्व विक्रम मोडणारं मताधिक्य.. • 2017 साली देशाचं लक्ष वेधणारी गोपीनाथगड-भगवानगड रॅली. • स्वपक्षीयांनी षडयंत्रं करुनही दरवर्षी भगवानभक्तीगडावर लाखोंचा समुदाय आणि चर्चा फक्त तुमच्याच दसरा मेळाव्याची. • लोकसभेच जातवार जनगननेची मागणी करताना तुम्ही वडिलांप्रमाणेच वंचित शोषितांचा आवाज बनण्याची चुणूक दाखवता. • तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही. अरे लेकरांनो,हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे हवे आहेत जनसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे, कुठल्याही अटीशिवाय फोनवर कामं करणारे, अर्ध्या रात्री फोन उचलणारे. मुलगामी विचारांच्या पक्षात राहून लोकगामी नितींचा अवलंब करत राजनिती करणारे...अन्याय दडपण वेदना सोसत पक्षाशी निष्ठा जपत जपत वंचित पीडित शासित शोषितांच्या ‘वेदना आणि वाणी’ सोबत अधिक प्रखर निष्ठा जपत विरोधकांशी थेट भिडणारे… आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे. ही तर सुरुवात आहे…!
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या