Home /News /nashik /

मुंबई-नाशिक महामार्गावर पोलिसांनी व्हॅन पलटली, 1 जण गंभीर तर 10 जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर पोलिसांनी व्हॅन पलटली, 1 जण गंभीर तर 10 जण जखमी

  जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिक, 16 एप्रिल : मुंबई नाशिक महामार्गावर ( Mumbai-Nashik highway ) पोलिसांच्या व्हॅनला अपघात (Police van accident) झाल्याची घटना घडली आहे. भरधाव पोलिसांची व्हॅन पलटी झाल्यामुळे एक जण गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला.  माणिक खांब शिवारातील वळणावर नाशिक ग्रामीण पोलिसांची व्हॅन अचानक पलटी झाली. चालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅन पलटी झाल्याचे सांगितले जात आहे. या  अपघातात एक जण गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी  झाले आहे.  जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त व्हॅन बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. जळगाव डीपीला कंटेनर धडकले, चालक जागीच ठार दरम्यान, जळगाव जिल्ह्यात  कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने विजेच्या डीपीला वाहन धडकून विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडील असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा संपणार? CPL गाजवणाऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश) जळगाव शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला कंटेनरवरील चालकाने आज गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून संबंधीत चालकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालात पाठविण्यात आला आहे.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या