Home /News /nashik /

पैसे दे, अर्धनग्न होऊन तृतीयपंथीयांची प्रवाशांना मारहाण, नाशिकमधील घटनेचा LIVE VIDEO

पैसे दे, अर्धनग्न होऊन तृतीयपंथीयांची प्रवाशांना मारहाण, नाशिकमधील घटनेचा LIVE VIDEO

हा सगळा राडा सुरू असताना मात्र, टोलचे कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर प्रवासी मात्र बघ्याची भूमिकेत होते. या हाणामारीत दोन प्रवाशी जखमी झाले आहे.

नाशिक, 18 ऑगस्ट : तृतीयपंथीयांना (transgender) समाजात समानतेची वागणूक द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. पण आज नाशिकमधील (nashik) शिंदे टोलनाक्यावर (shinde toll naka) एक अजब प्रकार घटला. पैसे देण्याच्या वादावरून तृतीयपंथीयांनी तुफान राडा घालत प्रवाशांना मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिकमधील शिंदे टोल नाक्यावर आज दुपारी ही घटना घडली. नेहमी प्रमाणे तृतीयपंथीयांचे टोळके येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे पैसे मागत होते. पण, पैसे देणावरून एका कारचालकाशी वाद झाला. कारचालक आणि त्याचे मित्रांना तृतीयपंथीयांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन तृतीयपंथीयांनी प्रवाशावर हात उगारला. त्यामुळे प्रवाशानेही प्रतिकार करत तृतीयपंथीयांवर हल्ला चढवला. तिथे उपस्थितीत असलेल्या इतरही तृतीयपंथीयांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाहीतर एका तृतीयपंथीयाने अर्धनग्न होऊन धुमाकूळ घातला होता. प्रवाशाच्या डोक्यात दगड घालण्याचाही प्रयत्न झाला. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत चोरांची जत्रा, पीएचे 1 लाख, आमदारांचे मोबाईल गायब हा सगळा राडा सुरू असताना मात्र, टोलचे कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर प्रवासी मात्र बघ्याची भूमिका घेत होते. या हाणामारीत दोन प्रवाशी जखमी झाले आहे. घटनास्थळावर उपस्थितीत असलेल्या काहीही जणांनी हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या टोलनाक्यावर तृतीयपंथीयांचा सुळसुळाट पाहण्यास मिळतोय. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून जबरदस्ती आणि दादागिरी करून पैसे वसूल केले जातात. तृतीयपंथीयांच्या नादी लागू नये म्हणून प्रवाशांही पैसे देऊन सुटकेचा प्रयत्न करता. पण, आज हा प्रकार दोन प्रवाशांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Transgender

पुढील बातम्या