मराठी बातम्या /बातम्या /nashik /एकाला वाचवण्याचा नादात कारने दुचाकीस्वाराला उडवले, महिला अवघ्या इंचभराने वाचली, अपघाताचा LIVE VIDEO

एकाला वाचवण्याचा नादात कारने दुचाकीस्वाराला उडवले, महिला अवघ्या इंचभराने वाचली, अपघाताचा LIVE VIDEO

कारचालकाने जोरात ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कारवर नियंत्रण मिळवता आले नाही.

कारचालकाने जोरात ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कारवर नियंत्रण मिळवता आले नाही.

कारचालकाने जोरात ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कारवर नियंत्रण मिळवता आले नाही.

नाशिक, 17 जुलै : नाशिक वणी महामार्गावर (Nashik Wani Highway) अंगावर शहारे आणणार भीषण अपघात (accident cctv video) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात भरधाव स्विफ्ट कारने (swift car accident) दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-वणी महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात सुनील काळोघे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.  वणी महामार्गावर लखमापूरजवळ एक वृद्ध व्यक्ती स्कुटरवरून रस्ता ओलांडत होती. नेमकं त्याचवेळी एक भरधाव स्विफ्ट कार आली. कारचालकाने जोरात ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कारवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे चालकाने महामार्गाच्या खाली कार उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सुनील काळोघे हे दुचाकीवरून जात होते, त्यांनाच कारने जोरात धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीसह सुनील दूरपर्यंत फेकले गेले. दुचाकीला उडवल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खांबाला जावून धडकली. धक्कादायक म्हणजे, त्याच ठिकाणी एक महिला दुचाकीजवळ उभी होती. या कारने त्या दुचाकीलाही धडक दिली. अवघ्या काही इंचाने ही महिला थोडक्यात बचावली.

20 वर्षानंतर सीरिअल किलर फासावर; ४७ वार करून केली होती अभिनेत्रीची हत्या

अपघाताची थरारक घटना महामार्गालगत असलेल्या एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आणे घाटात पर्यटकांच्या कारला अपघात, 1 ठार 3 जखमी

दरम्यान, चारचाकी वाहनाने भिंमाशंकर येथे पर्यटनाला जाणाऱ्या नेवाशातील युवकांचा नगर-कल्याण महामार्गावर  जुन्नर तालुक्यातील आणे घाट  येथे अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 3 जन जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील पाच युवक शनिवार रविवार सुट्टी असल्याने स्विफ्ट कारने शुक्रवारी रात्री नेवासा येथून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, शिवनेरी या ठिकाणी फिरण्यासाठी जात होते.

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत विनोदाचा बादशाह घेणार एन्ट्री; जॉनी लिव्हर विशेष भाग

पुणे जिल्ह्यातील आणे गावाजवळील आणे घाटातून आळेफाटाकडे जाताना घाटात पाऊस चालू असल्याने व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही आणि  रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडावर स्विफ्ट गाडी धडकली. या अपघातात नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील 24 वर्षीय युवक अमोल रमेश लोखंडे हा ठार झाला तर स्विफ्ट गाडीतील तीन जण गंभीर, एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

First published:
top videos