Home /News /nashik /

'कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद राहणार', संजय राऊतांचं स्पष्टीकरण

'कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद राहणार', संजय राऊतांचं स्पष्टीकरण

'शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही'

  मुंबई, 13 जून : 'मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे (Shivsena) पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकार (MVA Government) स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे' असं पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 'आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही.  शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं' असं राऊत यांनी स्पष्ट केलं. 'महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं गैर नाही. 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष आहे' असंही राऊत म्हणाले.

  रॉबिन्सन प्रकरणानंतर ECB नं घेतला धडा, खेळाडूंबाबत घेणार कठोर निर्णय

  'मी कार्यकर्त्यांना केलेल्या भाषणाचा व्हिडीओ कुणी तरी बाहेर काढलं. मी स्वाभिमानाने राहिलं पाहिजे, असं विधान केलं होतं. भाजपसोबत युती केली तेव्हा सेनेला वागणूक दिली जात होती, त्याबद्दल मी बोललो आहे. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आम्ही स्वाभिमानाने सत्तेत आहोत. त्यामुळे आम्हाला दिल्लीला जायचे असेल तर मुख्यमंत्री म्हणून जातोय. यात गुलामगिरीचा प्रश्नच येत नाही. स्वाभिमानाचे दुसरे नाव हे शिवसेनाप्रमुख आहे. हे समजून घ्या', असंही राऊत म्हणाले. 'देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहे. त्यांच्या विरोधात नवी आघाडी निर्माण केली तर बरोबरीची लढाई लढता येईल. पश्चिम बंगालमध्ये जे झालं त्या अमित शहा आणि मोदींचा पराभव झाला. भविष्यात जर काय होणार याचे आखाडे बांधता येणार नाही.  इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांना राजकारण मुठीत ठेवता आले नाही. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाहीय' असंही राऊत म्हणाले. 'प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्यात. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकांबाबत माहिती गोळा करून ती पक्षांना देणे हे त्यांचं काम आहे. कधीकाळी प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत होते. पंजाबमध्ये कॅप्टन अमेंद्ररसिंग, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम केले आहे. शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी काम केले आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार हे नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून माहिती गोळा करत असता, असा माझा अनुभव आहे' असंही राऊत यांनी सांगितलं. 'रुग्णालयात माझ्या आईसोबत छेडछाड झाली आणि...'; चिमुकलीची स्मृती इराणींकडे तक्रार 'वारीचा निर्णय सरकारने कोरोना लाट रोखण्यासाठी घेतला आहे. कोरोना वाढला तर विरोधक रोखणार का? मराठा आरक्षण ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते. त्यामुळे संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी' असंही राऊत म्हणाले. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय असेल. स्थानिक निवडणुका आहे. त्या स्वबळावर लढण्याचा त्यांचा विचार आहे. यात चुकीचे काही नाही. सरकार स्थापन करत असताना आम्ही काही करार केला नव्हता. लवकरच खणखणीत बातमी आम्ही देऊ, असंही राऊत म्हणाले. नवी मुंबई विमानतळ बाळासाहेब ठाकरे नाव योग्य आहे. याबद्दल काही संघटना आंदोलन करत आहे. पण, नाव देण्याची घोषणा झाली आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Sanjay raut

  पुढील बातम्या