Home /News /nashik /

भोंग्याच्या राजकारणात शिर्डी संस्थानाचा मोठा निर्णय; इतिहासात पहिल्यांदाच साईबाबा मंदिरात घडली ही घटना

भोंग्याच्या राजकारणात शिर्डी संस्थानाचा मोठा निर्णय; इतिहासात पहिल्यांदाच साईबाबा मंदिरात घडली ही घटना

सध्या देशभरात भोंग्याचं राजकारण सुरू असताना शिर्डी (Shirdi) संस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे.

  सुनिल दवंगे/ शिर्डी, 4 मे : भोंगावाद आणि त्याच बरोबरीने सुप्रीम कोर्टाचे निर्देश यामुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र साईबाबा संस्थानाने सामंजस्याची (Shirdi News) भूमिका घेत इतर देवस्थान आणि प्रार्थनास्थळांपुढे आदर्श ठेवला आहे. तीन तारखेच्या रात्रीच्या शेजारतीपासून साई मंदिराचे लाऊड स्पिकर बंद करण्यात आले आहेत. इतिहासात प्रथमच श्री साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पिकर विनाचं झाली आहे. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली परंतु अजानसाठी कोणीही स्पिकरचा वापर केला गेला नाही. साईबाबांनी साठवर्षाहुन अधिक काळ शिर्डीत वास्तव करत सर्व धर्म समभावची शिकवण देत, अवघ्या विश्वाला सबका मालिक एकचा संदेश दिला. येथील पडक्या मशिदीत साईंनी धुनी प्रज्वलीत केली. साईबाबा आपल्या हयातीत मशिदीला द्वारकामाई नावाने संबोधत असे. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि हिरवा रंग असलेला हिंदू-मुस्लीमांच्या एकतेचा ध्वज फडकवला जातो. हिंदू- मुस्लिम एकतेची अनोखी परंपरा  परंपरेनं साईमंदिरात दररोज सकाळी 9:45 वाजता साईच्या समाधी समोर हिंदू आणि मुस्लीम मानकरी एकत्र येऊन समाधीवर चादर चढवून फुले वाहत साई दर्शन घेतात. साई समाधीच्या उत्तरेकडील बाजुने मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुने हिंदू मानकरी उभे राहुन फुले वाहत प्रार्थना करण्याची परंपरा ही गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासुन सुरु आहे. साईच्या मंदिरात आजही सर्वधर्मीय भक्त माथा टेकवून दर्शन घेतात. शिर्डीत द्वारकामाई अर्थात मजिदीवरही लाऊड स्पीकर असून त्यावरुन साई मंदिरात होणा-या चार मोठ्या आणि एक छोटी अशा पाच आरत्याचं प्रसारण केल जातं. प्रत्यक्षात साईमंदिरात आरत्यांना उपस्थित राहु न शकणारे हजारो भाविक या आरत्याच्यांच आवाज ऐकत आरत्यात सहभागी होत असतात. हे ही वाचा-#Hanumanchalisa Nashik Police आयुक्तांचा आणखी एक दणका, भोंग्यांच्या आवाजाबाबत नवा आदेश साईच्या मंदिरात पहाटे 05:00 वाजता भुपाळी ध्वनीफित रेकॉर्ड सुरू होते. त्यानंतर पहाटे 05:15 वाजता काकड आरती केली जाते. त्यानंतर सकाळी 05:50 वाजता श्रींचे मंगलस्‍नान व त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होते. तर रात्री 10:00 वाजता श्रींची शेजारती सुरु होते. पूर्वी या आरत्या साईमंदिर आणि परीसरात लावण्यात आलेल्या स्पीकरद्वारे ऐकवल्या जात. मात्र 03 मेला शिर्डी पोलिसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊड स्पिकर वापरण्यास परवानगी नसल्याने साईमंदीरावरील लाऊड स्पिकर वापरु नये, असे आदेश दिल्याने 03 मे ला रात्री साईमंदिरात झालेला शेजआरती आणि 04 मेला पहाटेच्या काकड आरती स्पिकरवरुन प्रसारीत करण्यात आली नाही. कोर्टाच्या आदेशाचे पालन साईमंदिरात केल जाणार असल्याच साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं आहे. शिर्डीत नेहमीच सामाजिक एकोपा जपण्याच काम केलं जातं. शिर्डीत एकूण सहा मशिदी असून 4 मे च्या सकाळची अजाण करण्यात आली. मात्र त्यासाठी ध्वनीक्षेपकांचा वापर गेला नाही. सबका मालिक एक आणि सब धर्म एक समान असलेल्या शिर्डीतील साईमंदिरातील पहाटेची काकड आणि रात्रीची शेजारती सर्वधर्मीय भक्तांसाठी बाहेरील स्पिकरवर सुरुच ठेवण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांकडून करणायात येते आहे. साईबाबा देवस्थानाला सर्व जाती धर्माचे व सर्व पंथाचे भाविक भक्त जवळपास 150 वर्षांपासुन म्हणजे बाबा हयात असल्यापासुन डोकं टेकवुन आशीर्वाद घेतात. त्यामुळे साईबाबा मंदिरात नित्यनेमाने सुरु असणाऱ्या काकड आरती व शेजारतीचा आवाज कळसावरील अत्याधुनिक स्पिकरमधून संपूर्ण गावात अतिशय चांगल्या व मंजुळ आवाजात चालू असताना व याबाबत कोणत्याही समाजाची अथवा धर्माची सामूहिक तक्रार नसताना स्पिकर बंद करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ प्रमोद गोंदकर यांनी केली आहे. साईमंदिरातील दिनक्रम पहाटे 05:00 वाजता भुपाळी रेकॉर्डने सुरू होईल. लाऊड स्पिकर बंद - पहाटे 05:15 वाजता काकड आरती- लाऊड स्पिकर बंद.. सकाळी 05:50 वाजता श्रींचे मंगलस्‍नान व त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती लाऊडस्पिकर बंद. सकाळी 06:25 वाजता दर्शनास प्रारंभ लाऊड स्पिकर सुरु. दुपारी 12:00 वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती लाऊड स्पिकर सुरू सूर्यास्‍ताच्या वेळी श्रींची धुपारती लाऊड स्पिकर सुरू.. रात्री 10:00 वाजता श्रींची शेजारती लाऊड स्पिकर बंद. रात्री 10:45 वाजता समाधी मंदिर बंद होते.

  तुमच्या शहरातून (नाशिक)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi

  पुढील बातम्या