मराठी बातम्या /बातम्या /nashik /

...आणि छगन भुजबळ आणि फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

...आणि छगन भुजबळ आणि फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

 यावेळी इम्पेरिकल डेटाच्या मागणीवरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू टोलावला तर भुजबळ यांनी...

यावेळी इम्पेरिकल डेटाच्या मागणीवरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू टोलावला तर भुजबळ यांनी...

देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या लावलेले भाजपचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला होता.

नाशिक, 08 जुलै: पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) एकमेकांसमोर उभे ठाकलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज एकाच व्यासपीठावर आले. नाशिक शहर बससेवा (Nashik city bus service) लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले.

नाशिक शहर बससेवा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  व्यासपीठावर उदघाटक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ यासह गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ उपस्थित होते. यावेळी सिटीलिंक बस मोबाईल ऍप्लिकेशन, शहर बससेवा वेबसाईट, याचंही देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी ऑनलाइन उदघाटन केलं. यावेळी 'जलनीती' या महापौर सतीश कुलकर्णी लिखीत पुस्तक अनावरणही करण्यात आले.

 फडणवीस यांचे फलक हटविल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त

दरम्यान, महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण  करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या लावलेले भाजपाचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला होता.

'माझ्यामुळे देशाची बदनामी झाली', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं मागितली माफी! VIDEO

हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.या पूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये फलक लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का असा प्रश्न भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपस्थित केला.

तुमचंही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खातं आहे का? होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा सविस्तर

केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने फलक हटविले असा आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला. यावेळी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्याशी या पदाधिकाऱ्यांनी फोन केला असता त्यांनी आयुक्तांना सांगा असे सांगून फोन कट केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापात भर पडली.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Nashik