Home /News /nashik /

आधी कर्मचारी शूटींग बघण्यात बिझी, नंतर रुग्णालयातच रंगली दारू पार्टी, नाशकातला Shocking प्रकार

आधी कर्मचारी शूटींग बघण्यात बिझी, नंतर रुग्णालयातच रंगली दारू पार्टी, नाशकातला Shocking प्रकार

नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) चक्क सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आल्याचं समजतंय.

नाशिक, 29 एप्रिल: नाशकातून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) चक्क सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आल्याचं समजतंय. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन ही केलं आहे. याचे फोटो आता समोर आले आहेत. नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयात सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशनही केलं आहे. यावेळी शूटींग बघण्यात कर्मचारी बिझी होती त्यामुळे रुग्णांचे हाल झालेले पाहायला मिळाले. शूटींग दरम्यान रुग्णालयाततच दारूची पार्टी रंगल्यानं एकच खळबळ माजली आहे. VIDEO: भाषण करतानाच रतन टाटा झाले Emotional,आयुष्यातील शेवटची वर्षे... यारुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे 22 जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. झाकीर हुसेन रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जरी परवनगी घेऊन सिनेमाची शूटींग सुरु असली तरी अटीशर्तींचा भंग झाल्याचंही उघड झालं आहे. गॅस गळतीमुळे झाला होता 22 जणांचा मृत्यू वर्षभरापूर्वी नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले होते. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली होती.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या