'मी आत्महत्या करतो, माझी शूटिंग काढा' म्हणत नाशकातील तरुणाची पुलावरून उडी; VIDEO Viral

'मी आत्महत्या करतो, माझी शूटिंग काढा' म्हणत नाशकातील तरुणाची पुलावरून उडी; VIDEO Viral

Nashik youth attempt to suicide by jumping from bridge: नाशिकमधील एका तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असे उद्योग तुम्ही करू नका.

  • Share this:

नाशिक, 15 जून: नाशिकमधील एका तरूणाने नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या (Nashik youth attempts suicide) करण्याचा प्रयत्न केला. "मी आत्महत्या करतोय माझी शूटिंग काढा" असे म्हणत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावर हा संपूर्ण प्रकार घडला. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Video Viral in Social Media) होत आहे. अशा प्रकारचं कृत्य तुम्ही चुकूनही करू नका.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावरुन (Darna River Bridge) उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करताना या तरुणाने माझी शूटिंग काढा मी नदीत उडी मारत आत्महत्या करत असल्याचं ओरडून सांगत होता.

लव्ह, सेक्स, धोखा : लग्नाचं आमिष दाखवून IAS अधिकाऱ्यानं MBBS तरुणीचं केलं लैंगिक शोषण

त्यावेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि नेमका हा प्रकार काय आहे हे कळेनासं झालं. हा प्रकार पाहून काही नागरिकांना तात्काळ धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कठड्याला धरलेला हात सोडला आणि मग तो खाली नदी पात्रात कोसळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांनी या तरुणानाल नदी पात्रातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर नाशिकमधील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याची माहिती मिळू शकलेली नाहीये. तसेच हा एक स्टंट आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 15, 2021, 10:19 PM IST

ताज्या बातम्या