मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik: नाशकात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला वाडा, पाहा LIVE VIDEO

Nashik: नाशकात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला वाडा, पाहा LIVE VIDEO

Nashik Wada Collapsed caught in Camera: नाशिकमधील वैश्य वाडा सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळला. वाडा कोसळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 3 जुलै : नाशिक शहरातील घनगर गल्ली (Ghangar Galli Nashik) येथील एक वाडा सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळला. घनगर गल्ली येथे असणारा वैश्य वाडा कोसळतानाचा एक व्हिडीओ (Vaishya Wada collapse video) सुद्धा समोर आला आहे. वाडा कोसळल्यानंतर दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. या महिलांना ढिगाऱ्याखालून तात्काळ बाहेर काढून (2 women rescue) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास घनगर गल्लीतील वैश्य वाडा अचानक कोसळला. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचा, प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हा वाडा कोसळला आहे.

संजय राऊत - आशिष शेलारांमध्ये गुप्त भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या. घटनास्थळी पोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना, तात्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

एक पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यास जवानांना यश मिळालं. या दुर्घटनेत 55 वर्षीय संगीता अजित वैश्य आणी 27 वर्षीय रिता अभिषेक वैश्य या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Maharashtra, Nashik